Three killed in Dhadgaon rain | वादळी पावसाने धडगाव तालुक्यात तिघांचा मृत्यू
वादळी पावसाने धडगाव तालुक्यात तिघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मंगळवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने धडगाव तालुक्यात तीन जणांचा मृत्यू झाला. तर जिल्हाभरात 100 पेक्षा अधिक घरांची पडझड झाली. 
मंगळवारी सांयकाळी सहा वाजेनंतर रात्री उशिरार्पयत जिल्ह्यात जोरदार वादळासह पाऊस झाला. त्यात मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. धडगाव तालुक्यात सतुबाई शेमटय़ा पाडवी (53) रा.मोख बुद्रूक व कोळ्या बाहद:या पावरा (40) रा.खर्डी बुद्रूक या दोघांचा वीज पडून मृत्यू झाला. तर अश्विना गणेश वळवी (7) रा.कात्रीचा कामोदपाडा ही बालिका नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाला आहे. याबाबत धडगाव तहसीलदारांनी बुधवारी जिल्हा प्रशासनाला माहिती कळविली आहे. दरम्यान या वादळात नंदुरबार तालुक्यातील 70, तळोदा तालुक्यातील 19 तसेच धडगाव तालुक्यातील धनाजे बद्रूक, राडीकलम, कुसूमवेरी आदी गावातील घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्यात जवळपास 100 पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले असून, त्याचे पंचनामे सुरू आहे.
 


Web Title: Three killed in Dhadgaon rain
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.