साडेतीन हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदीविना पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:27 PM2020-05-29T12:27:22+5:302020-05-29T12:29:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील साडेपाच हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. परंतु पावसाळा तोंडावर आलेला असतांना ...

Three and a half thousand farmers fell without buying cotton | साडेतीन हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदीविना पडून

साडेतीन हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदीविना पडून

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील साडेपाच हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. परंतु पावसाळा तोंडावर आलेला असतांना साडेतीन हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे म्हणजे तारेवरची कसरत राहणार आहे. ही बाब लक्षात घेता कापूस उत्पादक शेतकºयांच्या कापसाची तपासणी जागेवर जावून करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. यामुळे शेतकºयांच्या जिवात जीव आला आहे.
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केलेल्या शेतकºयांकडे प्रत्यक्षात विक्रीसाठी शिल्लक कापसाची माहिती घेण्यासाठी नोंदणीकृत कापूस उत्पादक शेतकºयांकडे प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी व पंचनामा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी यंत्रणेला दिले आहेत.
शासनाने २४ एप्रिल पासून राज्यात कापूस खरेदीस पुन्हा प्रारंभ केला आहे. जिल्ह्यातील शेतकºयांकडे कापूस विक्रीसाठी शिल्लक आहे. २६ मे अखेर नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार ५४८ कापूस उत्पादक शेतकºयांनी कापूस विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केली आहे. २ हजार २०१ शेतकºयांनी त्यांच्याकडील कापसाची विक्री केली. विविध कारणामुळे जिल्ह्यातील ३ हजार ३४७ नोंदणीकृत शेतकºयांचा कापूस विक्री होणे बाकी आहे. राज्यात कापूस खरेदीचे बाजार मुल्य दर व शासनाचे हमीभाव दर यामध्ये तफावत आहे. कापूस खरेदीचे शासनाचे हमीदर हे बाजारातील दरापेक्षा जास्त असल्यामुळे जिल्ह्यातील काही व्यापारी हे शेतकºयांच्या माध्यमातून कापूस विक्री करण्याची शक्यता आहे. तसेच लवकर पावसाळ्यास सुरूवात होणार असून जिल्ह्यातील नोंदणीकृत कापूस उत्पादक शेतकºयांकडे विक्रीसाठी शिल्लक कापसाची आकडेवारी जाणून घेण्यासाठी शेतकºयांच्या गावनिहाय याद्या तयार करण्याचे आदेश सहायक निबंधक, सहकारी संस्था यांना देण्यात आले आहेत.
पथकाची नेमणूक
शेतकºयाकडील शिल्लक कापसाची माहिती संकलनासाठी तहसिलदारामार्फत नियोजन करण्यात येणार आहे. तलाठी,ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी त्यांना नेमून दिलेल्या गावनिहाय याद्या प्राप्त झाल्यानंतर दोन दिवसात प्रत्यक्ष जागेवर जाऊन संबधीत शेतकºयाच्या सातबारा उताºयावरील कापूस पिकाखाली एकूण क्षेत्राची आणि शिल्लक कापसाची खात्री करण्यासाठी कापूस साठ्याचे शेतकºयासह फोटो घ्यावेत. ही प्रक्रीया दोन दिवसात पूर्ण करावी. गाव निहाय तपासणी पंचनामा झालेल्या यादीपैकी प्रत्येकी १० टक्के याद्यांची फेरतपासणी संबधीत तालुक्यातील तहसिलदार, गट विकास अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांनी केल्यानंतर गावानिहाय याद्या संबधित तहसिलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सहायक निबंधक यांच्या ताब्यात पुढील कार्यवाहीसाठी देणे आवश्यक आहे.

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांनी तपासणी झालेल्या यादीप्रमाणे संबंधित कृषी उत्पन्न बाजारसमितीमार्फत यादीत नमूद शेतकऱ्यांचा कापूस प्राथम्याने खरेदी केला जाईल. यामुळे शेतकऱ्यांच्या नावाखाली खाजगी व्यापाºयांनी खरेदी केलेला कापूस बाजार समितीत विक्रीसाठी येणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी त्यांचेकडील नोंदणीकृत शेतकºयांची कापूस खरेदी प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वाप्रमाणे करण्यात येईल. याबाबत शेतकºयाची कोणतीही तक्रार येणार नाही यासाठी सहायक निबंधकानी उपाययोजना करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.


 

Web Title: Three and a half thousand farmers fell without buying cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.