Theft in the city's Desipura area | शहरातील देसाईपुरा भागात चोरीचा प्रयत्न
शहरातील देसाईपुरा भागात चोरीचा प्रयत्न


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील देसाईपुरा भागात बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न झाला़ चोरट्यांना घरात कोणताही मुद्देमाल न मिळाल्याने त्यांनी तोडफोड करत पळ काढला़ बुधवारी सकाळी ६ वाजता ही घटना उघडकीस आली़
देसाईपुरा भागात राजेंद्र छगन चौधरी यांच्या मालकीचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची माहिती त्यांना शेजाऱ्यांकडून देण्यात आली होती़ त्यांनी तातडीने घरी धाव घेतली असता, चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील लाकडी कपाट फोडून त्यातील वस्तू अस्ताव्यस्त फेकलेल्या दिसून आल्या़ चोरट्यांनी अपेक्षित असे काहीही हाती न लागल्याने त्यांनी घरातून पळ काढला असावा असा अंदाज आहे़
अत्यंत दाट वस्तीत झालेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी पथकासह भेट देत माहिती घेतली होती़ याबाबत राजेंद्र चौधरी यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत़

Web Title: Theft in the city's Desipura area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.