ब्राह्मणपुरी परिसरात पीकांच्या नुकसानीसह शेती साहित्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:34 PM2020-06-01T12:34:12+5:302020-06-01T12:34:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसरात गेल्या महिनाभरापासून शेतीपयोगी वस्तूंची चोरी करण्यासह नासधुम करण्याचे सत्र सुरूच ...

Theft of agricultural inputs including crop damage in Brahmanpuri area | ब्राह्मणपुरी परिसरात पीकांच्या नुकसानीसह शेती साहित्याची चोरी

ब्राह्मणपुरी परिसरात पीकांच्या नुकसानीसह शेती साहित्याची चोरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसरात गेल्या महिनाभरापासून शेतीपयोगी वस्तूंची चोरी करण्यासह नासधुम करण्याचे सत्र सुरूच असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ब्राह्मणपुरी परिसरात काही शेतामध्ये बºयाच शेतकऱ्यांनी टरबूज, डांगर आदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली. या फळांना वाचविण्यासाठी शेतकºयांनी दुष्काळात हजारो रूपये पाण्यावर खर्च केले व दुष्काळाशी दोन हात केले. परंतु आता कोरोनासमोर शेतकरी हतबल झाला असून, या फळांना खरेदीदार उपलब्ध नसल्यामुळे फळे झाडालाच सडत आहेत.
शेतकºयांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्याच बरोबर केळी, पपई पिकाला घेण्यासाठी व्यापारी फिरकत नसल्याने माल शेतातच पडून आहे. त्यातच शेतीउपयोगी वस्तूची नासधुम, फ्यूज पेट्या, वीज मोटार, केबल चोरीचे सत्र सुरूच असल्याने शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ब्राह्मणपुरी येथील शेतकरी सुभाष छगन मराठे यांनी ब्राह्मणपुरी शिवारातील आपल्या शेतात गंगाफळ या पिकाची लागवड केली होती तेथे पिकांना पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना चक्क आपल्या फ्यूज पेटीतील कट आऊट व मोटारीची केबल चोरीला गेल्याचे दिसून आले. फ्यूज पेटी, कट आऊटसह केबल चोरीस गेल्यामुळे पिकांना फटका बसला असून, मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून आले. तरी संबंधित भुरट्या चोरांचा पोलिसांनी त्वरित बंदोबस्त करावा अशी, मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Theft of agricultural inputs including crop damage in Brahmanpuri area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.