पूर्व हंगामी कापूस लागवड सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:39 PM2020-06-01T12:39:44+5:302020-06-01T12:39:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात पूर्व हंगामी कापूस लागवडीला वेग आला आहे़ यंदा मे ...

Start planting pre-seasonal cotton | पूर्व हंगामी कापूस लागवड सुरु

पूर्व हंगामी कापूस लागवड सुरु

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादे : नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात पूर्व हंगामी कापूस लागवडीला वेग आला आहे़ यंदा मे अखेरीस शेतकऱ्यांनी कामांना वेग दिला असून या भागात शेतातील उपलब्ध पाण्यावर कापसाची लागवड करण्यात येत आहे़
तालुक्यात गेल्या खरीप हंगामात कापूस उत्पादन समाधानकारक राहिले होते़ यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता़ यामुळे यंदाच्या वर्षात कापूस लागवडीत वाढ होण्याचे संके त होते़ हे संकेत खरे ठरत असून कोळदे, लहान शहादे, खोंडामळी, शिंदे व समशेरपूर परिसरातील गावांमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसात कापूस लागवडीच्या कामांना वेग आला आहे़ यामुळे बहुतांश महिला मजूरांना काम मिळाले असून शेतशिवारात सध्या सरकी टोचणीच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे़ शेतकºयांनी कृषीपंपांच्या भरवश्यावर ही कापूस लागवड सुरु केली असल्याने त्यांच्याकडून भारनियमनाची वेळ सांभाळून कापूस लागवड करण्यात येत आहे़ नंदुरबार तालुक्यात लहान शहादा व शिंदे परिसरातील गावांमध्ये किमान ५०० हेक्टर बागायती कापूस लागवड करण्यात येते़ यंदा यात १० टक्के वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे़ लॉकडाऊनमुळे मे महिन्याच्या मध्यात लागवड होणारा कापूस मेच्या अखेरीस पोहोचला आहे़ मान्सूनचे आगमन होण्यास अद्याप काही अवधी शिल्लक असल्याने शेतकरी कापूस लागवड करुन त्याच्या संगोपनाला सुरुवात करत आहेत़
दरम्यान दुसरीकडे मान्सूनची चाहूल लागली असल्याने शेतकरी नागंरटी तसेच इतर शेतीकामांना वेग देत आहे़ कापसासोबत ज्वारी व इतर धान्य पिकांचे शेतकºयांचे नियोजन असून त्यानुसार खत आणि बियाण्यांची खरेदी करण्यात येत असल्याची माहिती शेतकºयांकडून देण्यात आली आहे़

Web Title: Start planting pre-seasonal cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.