कारागिरांच्या शोधासाठी पथके कोलकाताकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:59 PM2019-11-13T12:59:26+5:302019-11-13T12:59:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सराफ व्यावसायिकांचे 1 किलो सोने बंगाली कारागिरांनी लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी शहादा शहरात ...

Squads leave for Kolkata to search for artisans | कारागिरांच्या शोधासाठी पथके कोलकाताकडे रवाना

कारागिरांच्या शोधासाठी पथके कोलकाताकडे रवाना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : सराफ व्यावसायिकांचे 1 किलो सोने बंगाली कारागिरांनी लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी शहादा शहरात उघडकीस आली होती़ सात बंगाली कारागिरांनी ‘कलाकारी’ करत 33 लाख 25 हजार रुपयांचे सोने चोरुन नेल्याचे समोर आले होत़े दरम्यान 875 ग्रॅम सोने पळवणा:या कारागिरांच्या शोधार्थ पथके पश्चिम बंगाल राज्यात रवाना झाली आहेत़ 
शहरातील सराफ व्यावसायिक शुद्ध सोन्याच्या बदल्यात बंगाली कारागिरांकडून आवश्यक त्या डिझाईनचे दागिने तयार करून घेतात़ या निमित्ताने 20 ते 25 बंगाली कारागिर अनेक वर्षापासून शहरात वास्तव्यास आहेत़ केवळ विश्वासावर कारागिर आणि सराफ व्यावसायिक यांच्यात व्यवहार सुरु असतात़ दरम्यान या विश्वासाला दिपनकर जयदेव मेहती उर्फ दीपक बंगाली, श्यामल अमर सामंत उर्फ श्यामल बंगाली, चंदू बंगाली, बापन सिंग बंगाली, कार्तिक बंगाली, आकाश बंगाली या सातही जणांनी तडा दिल्याचा प्रकार सोमवारी सकाळी समोर आला होता़ शहरातील महावीर चौकात राहणा:या या कारागिरांकडे शहादा सराफ बाजारातील व्यावसायिकांनी गेल्या महिनाभरात वेळावेळी शुद्ध सोने देऊन दागिने तयार करण्यासाठी सांगितले होत़े तब्बल 875 ग्रॅम सोने प्राप्त झाल्यानंतर या सातही जणांनी सोमवारी पळ काढला़
याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात कचरुलाल हिरालाल जैन यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सर्व सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक भदाणे करत आहेत़ 
सोमवारी आणि मंगळवारी पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्यासह पथकांनी जिल्ह्यात शोधमोहिम राबवली होती़़ सर्व कारागिर पश्चिम बंगाल राज्यातील असल्याने त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली़ विशेष म्हणजे सर्व संशयित वेगवेगळ्या मार्गाने शहाद्यातून बाहेर पडल्याची माहिती समोर आली असून त्यांच्या मोबाईल लोकेशनची माहिती घेणे पोलीसांनी सुरु केले आह़े 

Web Title: Squads leave for Kolkata to search for artisans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.