अक्कलकुव्यात सिङोरियन प्रसुतीची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:11 PM2019-11-19T12:11:40+5:302019-11-19T12:11:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात सिङोरियन शस्त्रक्रियेचे सूविधा उपलब्ध करण्यात आाली आहे. त्यामुळे आतार्पयत पाच महिलांची ...

Singorian delivery in Akkalkuwa | अक्कलकुव्यात सिङोरियन प्रसुतीची सुविधा

अक्कलकुव्यात सिङोरियन प्रसुतीची सुविधा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात सिङोरियन शस्त्रक्रियेचे सूविधा उपलब्ध करण्यात आाली आहे. त्यामुळे आतार्पयत पाच महिलांची यशस्वी सिङोरियन शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली आहे. 
अक्कलकुवा हा तालुका दुर्गम व अतिदुर्गम भागात विखुरला आहे.  दुर्गम भागात गरोदर मातांच्या प्रसूतीच्या वेळी गुंतागुंत निर्माण झाली तर तिला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयात हलविण्यात येत होते.  अनेकदा यात दुर्लक्ष किंवा  दिरंगाई झाल्यास गरोदर माता किंवा बाळ दगावण्याची शक्यता असते. शिवाय यात नागरिकांना मोठा  आर्थिक फटका बसत होता. परंतु अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात गुंतागुंतीची सिङोरियन शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे तालुक्यातील दुर्गम व दुर्गम भागातील नागरिकांची मोठी सोय झाली आहे.
अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात सिङोरियन शस्त्रक्रियेची सोय उपलब्ध झाल्यानंतर पाच   गरोदर मातांच्या यशस्वी सिङोरियन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. त्यात रायसिंगपूर व खटवणी येथील दोन महिलांची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. पहिल्या महिलेच्या पोटात पाणी       कमी होते व दुस:या महिलेचे  बाळ नियोजित कालावधीपेक्षा जास्त दिवसाचे होते. सोनोग्राफी रिपोर्ट वरून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय स्त्री रोगतज्ञ डॉ. गिरीष  तांबोळी यांनी घेतला. त्यांना बालरोगतज्ञ डॉ. सुजित पाटील, भुलतज्ञ डॉ. अंकुश परदेशी यांचे सहकार्य लाभेल.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गणेश पवार यांच्या पुढाकाराने ग्रामीण रुग्णालयात सिङोरियन शस्त्रक्रियेची सोय उपलब्ध झाली आहे. यामुळे अतिदुर्गम भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
 

Web Title: Singorian delivery in Akkalkuwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.