श्रॉफ हायस्कूलला विज्ञान नाटय़ोत्सवात द्वितीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:22 PM2019-11-21T12:22:08+5:302019-11-21T12:22:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील हि़गो़श्रॉफ हायस्कूलच्या संघाने विभागीय विज्ञान नाटय़ोत्सवात द्वितीय क्रमांक पटकावला़ नाशिक येथे प्रादेशिक विद्या ...

Shroff High School 2nd prize in science theater | श्रॉफ हायस्कूलला विज्ञान नाटय़ोत्सवात द्वितीय पुरस्कार

श्रॉफ हायस्कूलला विज्ञान नाटय़ोत्सवात द्वितीय पुरस्कार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील हि़गो़श्रॉफ हायस्कूलच्या संघाने विभागीय विज्ञान नाटय़ोत्सवात द्वितीय क्रमांक पटकावला़ नाशिक येथे प्रादेशिक विद्या प्राधिकरण व राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर आणि शिक्षण उपसंचालक यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली़
नाशिक शहरातील के. जे. मेहता हायस्कूलमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली़ यात श्रॉफ हायस्कूलच्या संघाने गांधीजींच्या नजरेतील विज्ञान  या विषयावर आधारीत विज्ञान नाटीका सादर केली होती.  
नाटीकेसाठी मुख्याध्यापीका सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षीका विद्या सिसोदिया, पर्यवेक्षक जगदीश पाटील, हेमंत पाटील, गिता महाजन, गायत्री पाटील, प्रतिभा साळूंके, नरेंद्र सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.
विभागीय स्तरावर व्दितीय क्रमांक मिळवलेल्या या नाटीकेत देवयानी मराठे, भूमी गोसावी, कल्याणी सोनवणे, दिशा पाटील, यश पवार, वैभव जगदाळे, निलेश पाटील व अक्षय पाटील या विद्याथ्र्र्यानी विविध भूमिका केल्या़ त्यांच्या अभिनय कौशल्याचा रसिकांसह विविध शाळांच्या संघाकडूनही गौरव करण्यात आला़ 
 

Web Title: Shroff High School 2nd prize in science theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.