बोडका झालेल्या सातपुड्याला गतवैभवाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:29 PM2020-02-23T12:29:06+5:302020-02-23T12:29:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सुमार वक्षतोडीमुळे सातपुडा पर्वत बोडका झाला आहे. बोडका झाला असला तरी पर्यटनासह अनेक विकास ...

 Satpuda with bodka needs spouse | बोडका झालेल्या सातपुड्याला गतवैभवाची गरज

बोडका झालेल्या सातपुड्याला गतवैभवाची गरज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सुमार वक्षतोडीमुळे सातपुडा पर्वत बोडका झाला आहे. बोडका झाला असला तरी पर्यटनासह अनेक विकास कामांसाठी हा भाग अनुकूल ठरत आहे. त्यामुळे वृक्षलागवड अथवा पर्यटन विकासाच्या योजना मंजूर होताच या भागात प्रशासन यंत्रणा मोहोचणे आवश्यक आहे. ज्यामधून या परिसरात पुन्हा गतवैभव प्राप्त होईल.
नैसर्गिक संपदेने परिपूर्ण सातपुड्याच्या विकासात भर टाकण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रशासन तेथे पोहोचणे अपेक्षीत होते. परंतु प्रशासन यंत्रणेऐवजी वनसंपदा लाटणारा घटकच आधी तेथे पोहोचला. त्यामुळे या सातपुडा पर्वतरांगेचे आबाळ निर्माण झाले. वनसंपदा लाटण्याच्या उद्देशाने जाणाऱ्या स्वार्थी घटकाने या परिसराच्या भवितव्याचा कदापी विचार केला नाही. निव्वळ फायदा करुन घेण्याचा नितीमत्तेमुळे या घटकाने वन संपदेचा फायदा घेतल्यानंतर संवर्धनासाठी त्यांनी अंशभरही योगदान दिले नाही. परिणामी हा सातपुडा अगदी बोडका झाला आहे.
लुटारुंशिवाय प्रशासनाला देखील सातपुड्यातील वनसंपदेचे संवर्धन केले पाहिजे, या भागाचे भवितव्य अबाधित ठेवले पाहिजे असे वाटलेच नाही. कुठल्याही एका घटकाने भवितव्याचा विचार केला असता तर कदाचित सातपुड्याची ही अवस्था झालीही नसती, असे धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील नागरिकांमार्फत सागण्यात येत आहे.
या परिसर पर्यटनासाठी अत्यंत अनुकूल आहेत. परंतु कुठल्याही यंत्रणेने त्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे या भागाचे आबाळ अधिकच अवघड होत गेले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या भागाच्या विकासासाठी केवळ प्रशासन व नेत्यांची इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. त्यातून बोडका झालेला सातपुड्याला गतवैभव प्राप्त होऊ शकेल.

सातपुडा हा चार राज्यांमध्ये पसरला असला तरी धडगाव व मोलगी परिसरात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. या स्थळांचा देव-देवतांशी संबंध जोडले जात आहे. या स्थळांची पुढील पिढीला ओळख व्हावी, यासाठी या स्थळांचा विकास होणे नितांत आवश्यकता आहे.
या भागात तोरणमाळसारखे काही ठिकाण आहे. त्यात धडगाव तालुक्यातील हातधुई येथील कोसळणाºया धबधब्यासह अन्य ठिकाणांचा उल्लेख करता येतो. हातधुईच्या धबधब्याचाही संबंध देवदेवताशी जोडले जात असून या घाटावर निसर्गपूजेवर आधारित गावदेवाची पूजा होते. महत्व प्राप्त त्यांचाही पर्यटनाच्या दिशेने विकास होणे आवश्यक आहे.

तीन राज्यातून वाहणारी नर्मदा ही नदी सातपुड्यासह विंध्यपर्वत रांगेच्या मधोमध वाहत आहे. विंंध्यपर्वतचा भाग महाराष्टÑ अथवा नंदुरबार जिल्ह्याचा भाग नसला तरी नदीच्या दुसºया बाजूचा सातपुडा जिल्ह्यात येतो. त्यात धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावे येत आहे. त्यापैकी बहुतांश गावांचे सरदार सरोवरमुळे पूनर्वसन करण्यात आले असले तरी काठावरील अनेक गावांमध्ये आजही नागरिक वास्तव्यास आहे. त्यांच्यापर्यंत विकास पोहोचला नाही, तेही मुळ प्रवाहात येण्याच्या प्रतिक्षेत आहे.

Web Title:  Satpuda with bodka needs spouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.