शिक्षकांनाही विमा संरक्षण मिळणार असल्याने समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:35 PM2020-06-01T12:35:24+5:302020-06-01T12:35:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोविड योद्धा म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना देखील विमा संरक्षण मिळावे, या करिता शिक्षक ...

Satisfaction as teachers will also get insurance protection | शिक्षकांनाही विमा संरक्षण मिळणार असल्याने समाधान

शिक्षकांनाही विमा संरक्षण मिळणार असल्याने समाधान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोविड योद्धा म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना देखील विमा संरक्षण मिळावे, या करिता शिक्षक परिषदेने राज्य शासनास निवेदन देऊन सातत्याने मागणी लावून धरली होती. या मागणीला यश आले असून राज्य शासनाने नुकताच याबाबत शासन निर्णय जाहीर केला.
कोविड योद्धा म्हणून काम करणाºया सर्व कर्मचाऱ्यांना राज्यशासनाने ५० लाख विमा संरक्षण देण्याचे जाहीर केले आहे. याबद्दल शिक्षक परिषदेच्यावतीने राज्य शासनाचे आभार व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह अनेकांकडे निवेदन देवून मागणीकडे लक्ष वेधले होते. राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे संस्थापक आमदार संजय केळकर, शिक्षक आमदार नागो गाणार, परिषदेचे प्रांताध्यक्ष वेणुनाथ कडू, राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्यावतीने राज्य शासनाकडे कोविड-१९ लढ्यात जे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी आहेत, त्यांचा शासनाने रुपये २५ लाखाचा आरोग्य विमा काढावा, अशी लेखी मागणी केली होती.
या मागणीचा राज्य पदाधिकाºयांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनाने २९ मे २०२० रोजी याबाबत शासन निर्णय पारित केला. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, पुरुषोत्तम काळे, जिल्हाध्यक्ष आबा बच्छाव यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले.

Web Title: Satisfaction as teachers will also get insurance protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.