लाडक्या गौतमला पिंपर्डेकरांचा साश्रुनयनांनी निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 11:51 AM2020-03-31T11:51:07+5:302020-03-31T11:51:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मंदाणे : शहादा तालुक्यातील पिंपर्डे येथील सैन्य दलातील जवान गौतम रंगराव चव्हाण (मराठे) यांच्यावर शोकाकूल वातावरणात ...

Sachrunyana's message to Lady Gautam Pimpedekar | लाडक्या गौतमला पिंपर्डेकरांचा साश्रुनयनांनी निरोप

लाडक्या गौतमला पिंपर्डेकरांचा साश्रुनयनांनी निरोप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंदाणे : शहादा तालुक्यातील पिंपर्डे येथील सैन्य दलातील जवान गौतम रंगराव चव्हाण (मराठे) यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले़ सैन्य दलातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, महसूल विभागाचे अधिकारी यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते़
पिंपर्डे येथील गौतम चव्हाण हे सैन्य दलात जम्मू-काश्मिर राज्यातील उधमपूर येथे कर्तव्य बजावत असताना दोन दिवसांपूर्वी त्यांचे ह्रदयविकाराने निधन झाले होते़ २०१७ पासून चव्हाण हे सैन्य दलाच्या ५७ वायरलेस युनिटमध्ये कार्यरत होते़ चव्हाण हे दीड महिन्यापूर्वीच सुटी घेऊन गावी येऊन गेले होते़ त्यांचे लहान बंधू अमोल चव्हाण हे देखील सैन्यात आहेत़ दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाचे वृत्त गावात धडकताच गावावर शोककळा पसरली आहे़
सकाळी गौतम चव्हाण यांचे पार्थिव पिंपर्डे येथे आणले गेल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला होता़ त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते़ फुलांनी सजविलेल्या ट्रालीतुन त्यांचे पार्थिक अंतिम संस्कारासाठी नेण्यात आले़ पिंपर्डे गावालगतच्या अमरधाम परिसरातील शेतात चबुतरा तयार करुन पार्थिक अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते़
यावेळी आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, आमदार राजेश पाडवी, प्रशासनाच्या वतीने प्रांत अधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, सैन्य दलाचे हवालदार नितीन चौधरी, हवालदार प्रशांत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळ, पोलिस निरीक्षक नजन पाटील, सैनिक कल्याण विभागांचे रामदास पाटील, सरपंच शंकर वाघ, उपसरपंच अमोल मराठे यांनी पुष्पचक्र वाहुन श्रध्दांजली दिली़
पोलीस प्रशासनाने हवेत तीन राऊंउ फायर करुन जवान चव्हाण यांना अभिवादन करण्यात आले़ दरम्यान,शहीद जवान गौतम चव्हाण यांच्या पार्थिवावर टाकण्यात आलेला तिरंगा त्यांचे वडील रंगराव चव्हाण यांना सोपवण्यात आला़ जवान गौतम चव्हाण यांचा लहान भाऊ अमोल हा अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावत आहे़ त्याला येण्यास उशिर होणार असल्याने चुलत भावाने अग्निडाग दिला़

Web Title: Sachrunyana's message to Lady Gautam Pimpedekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.