वर्ढे टेंभे येथील विहिरीतून वाचवलेल्या मादी बिबट्याची वनक्षेत्रात केली रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 02:00 PM2020-02-24T14:00:13+5:302020-02-24T14:01:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वर्ढे टेंभे ता़ शहादा येथे कुत्र्याला भक्ष्य बनवण्याच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याचे रेस्क्यू आॅपरेशन ...

Rescue of female crabs rescued from wells at Wardhe Dhembhe | वर्ढे टेंभे येथील विहिरीतून वाचवलेल्या मादी बिबट्याची वनक्षेत्रात केली रवानगी

वर्ढे टेंभे येथील विहिरीतून वाचवलेल्या मादी बिबट्याची वनक्षेत्रात केली रवानगी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वर्ढे टेंभे ता़ शहादा येथे कुत्र्याला भक्ष्य बनवण्याच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याचे रेस्क्यू आॅपरेशन वनविभागाने केले होते़ या बिबट्याला दोन दिवस शहादा वनविभागात ठेवल्यानंतर त्याची रवानगी वनक्षेत्रात करण्यात आली आहे़
रविवारी सकाळी वनविभागाच्या पथकाने बिबट्याची रवानगी शहादा वनक्षेत्रात केल्याची माहिती वनक्षेत्रपाल अनिल पवार यांनी दिली आहे़ उपवनसंरक्षक एस़बीक़ेवटे, सहायक वनसंरक्षक आऱएस़ झगडे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल पवार यांच्यासह वनकर्मचारी यांनी ही कारवाई केली़ दरम्यान बिबट्याला वनक्षेत्रात सोडण्यापूर्वी वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली होती़ तीन वर्षे वय असलेल्या मादी बिबट्याची प्रकृती सुदृढ असल्याचे सांगण्यात आले आहे़
मादी बिबट्याला वनक्षेत्रात सोडण्यात आल्यानंतर तालुक्यातील बिबट्यांचा अधिवास चिंतेचा विषय ठरत आहे़ मध्यप्रदेश सिमा, सातपुड्याचा पायथा आणि तापी काठालगत तब्बल आठ बिबट्यांचा संचार असल्याची माहिती समोर आली आहे़ या बिबट्यांच्या संचार हा प्रामुख्याने शेतशिवार आणि मानवी वस्तीचा परिसर असल्याने भिती वाढत आहे़ तापी काठालगतच्या गावांमध्ये ऊस, केळी, पपईच्या शेतांमध्ये निवास आणि अन्नाची व्यवस्था होत असल्याने बिबट्यांचा संचार येथे वाढल्याचे चित्र आहे़ वनविभागाकडून बिबट्या दिसून आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी जाऊन कारवाई होत असली तरी बिबट्यांपासून बचाव करणे किंवा त्यांना कोणत्याही संघर्षाविना शेतशिवारातून हुसकावून लावण्यासाठी वनविभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे़ गावोगावी रात्री अपरात्री तसेच दिवसाही हिंस्त्र प्राणी दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे़
काही दिवसांपूर्वी शेल्टी ता़ शहादा येथे बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती़ वन्यजीव शेतशिवारात मरुन पडत असल्याने त्यांनाही धोका असल्याने तातडीच्या उपाययोजना म्हणून वनविभागाने उपाययोजना करण्याची अपेक्षा वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे़

Web Title: Rescue of female crabs rescued from wells at Wardhe Dhembhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.