महामार्ग दुरुस्त करा अन्यथा 20 तारखेनंतर वाहतूक बंद करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 10:06 PM2019-11-13T22:06:59+5:302019-11-13T22:07:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा शहरातून जाणा:या शेवाळी ते नेत्रंग महामार्गाची दुरवस्था प्रवाशांना जेरीस आणत आह़े हा महामार्ग ...

Repair the highway or else close the traffic after the 20th | महामार्ग दुरुस्त करा अन्यथा 20 तारखेनंतर वाहतूक बंद करु

महामार्ग दुरुस्त करा अन्यथा 20 तारखेनंतर वाहतूक बंद करु

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा शहरातून जाणा:या शेवाळी ते नेत्रंग महामार्गाची दुरवस्था प्रवाशांना जेरीस आणत आह़े हा महामार्ग येत्या 20 नोव्हेंबर्पयत दुरुस्त न झाल्यास वाहतूक बंद पाडण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून याबाबत त्यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली आह़े     
तळोदा आणि अक्कलकुवा या दोन शहरांच्या दरम्यान शेवाळी ते नेत्रंग आणि ब:हाणपूर-अंकलेश्वर असे दोन महामार्ग आहेत़ दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा घाट गेल्या पाच वर्षापासून घातला जात आह़े दोन्ही रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे वर्ग करण्यात आले असल्याने जुन्या मार्गाची डागडुजी करण्याबाबतचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकार संपुष्टात आल्याची माहिती आह़े यातून गेल्या दोन वर्षात मार्गावर जागोजागी पडलेले खड्डे रुंदावून गंभीर स्थिती निर्माण झाली आह़े हा रस्ता दुरुस्तीबाबत सातत्याने पाठपुरावा करुनही कारवाई करण्यात येत नसल्याने अखेर नागरिक अक्कलकुवा येथून नंदुरबार जिल्ह्यातून जाण्यासाठी गुजरात राज्यातील रस्त्यांचा वापर करत आहेत़ यातून वर्दळ कमी झाली असली तरी गुजरात राज्यातून जादा अंतर कापावे लागत असल्याने त्यांचे हाल सुरु आहेत़ यात सर्वाधिक हाल शासकीय कर्मचा:यांचे होत असून त्यांना जादाचे अंतर सक्तीने कापावे लागत आह़े 
दरम्यान बुधवारी रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नागेश पाडवी यांच्यासह अक्कलकुवा शहर आणि परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत माहिती दिली़ यावेळी त्यांनी निवेदन देत कार्यवाही करण्याची मागणी केली आह़े महामार्ग हस्तांतर झाले असल्याने त्याचे कार्यालय नेमके, कुठे आहे, याची माहिती नसल्याने दाद मागावी कोणाकडे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला़ अक्कलकुवा, सोरापाडा ते वाण्याविहिर फाटा यादरम्यान दोन फूट खोल आणि सात ते आठ फूट लांबीचे खड्डे पडल्याने अपघात सुरु असल्याचे नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले होत़े  

अक्कलकुवा शहरातून गुजरातकडे मार्गस्थ होण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सोरापाडा येथील वरखेडी नदीच्या पुलाचीही गंभीर अवस्था आह़े पुलावरील डांबरीकरण पाच वर्षापूर्वीच उखडले होत़े तर यंदाच्या पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे कठडेही वाहून गेले आहेत़ अरुंद अशा या पुलावरुन दिवसभरात शेकडो अवजड वाहने गुजरात आणि महाराष्ट्रात प्रवेश करतात़ कठडे नसलेल्या पुलावरुन पायी चालणा:यांची वर्दळ असत़े रात्रीच्यावेळी अंदाज न आल्याने अवजड वाहन थेट पुलावरुन खाली कोसळण्याची भिती असल्याने पुलाची दुरुस्ती ही सर्वाधिक गरजेची असल्याचे सांगण्यात आले आह़े 

महामार्गवर गुलीउंबर्पयतच्या महाराष्ट्र हद्दीर्पयत रस्ता खराब असल्याने पावसाळ्यात वाहने फसून वाहतूकीची कोंडी होत होती़ ही कोंडी सोडवण्यासाठी अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे कर्मचारी सातत्याने मदत करुन मोलाची भूमिका बजावत होत़े पोलीस वाहनातून दगड आणून भराव करुन वाहने काढण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने केला गेला होता़ बुधवारी शहरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांची भेट घेत त्यांच्याजवळ महामार्ग दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता़ परंतू जिल्ह्यात कलम 144 लागू असल्याने त्यांनी नागरिकांना शांत करुन आंदोलन करण्याबाबत समज दिली होती़ त्यानंतर नागरिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत निवेदन दिल़े 20 नोव्हेंबर्पयत जिल्ह्यात कलम 144 लागू असल्याने त्यानंतरही रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आह़े 
 

Web Title: Repair the highway or else close the traffic after the 20th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.