नंदुरबारची कन्या रेणुका गावीत ठरली वैद्यकीय महाविद्यालयाची प्रथम विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 09:59 PM2020-11-19T21:59:24+5:302020-11-19T21:59:36+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शासकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून रेणुका प्रकाश गावीत ही नंदुरबारची कन्या प्रथम ...

Renuka Gavit, a daughter of Nandurbar, became the first student of a medical college | नंदुरबारची कन्या रेणुका गावीत ठरली वैद्यकीय महाविद्यालयाची प्रथम विद्यार्थी

नंदुरबारची कन्या रेणुका गावीत ठरली वैद्यकीय महाविद्यालयाची प्रथम विद्यार्थी

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  शासकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून रेणुका प्रकाश गावीत ही नंदुरबारची कन्या प्रथम विद्यार्थिनी ठरली आहे. रेणुका गावीत हीने २०२०-२१ या वर्षापासून सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होत महाविद्यालयात रेटेंन्शन अर्ज भरून देत प्रवेश निश्चित केला. 
नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०२०-२१ या वर्षात प्रथम वर्ष एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीत सामाईक प्रवेश परीक्षेतून उत्तीर्ण ८४ विद्यार्थ्यांची यादी अंतिम झाली आहे. १६ ते २० नोव्हेंबर दरम्यान प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यांतर्गत पहिल्या फेरीत रेणुका प्रकाश गावीत या विद्यार्थिनीचा प्रथम प्रवेश निश्चित झाला आहे. प्रथम प्रवेशित विद्यार्थिनी रेणुका गावीत हीचा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी शुक्रे यांनी गाैरव केला. यावेळी खासदार डाॅ. हीना गावीत, आमदार डाॅ. विजयकुमार गावीत, विद्यार्थिनीचे पालक प्रकाश गावीत हे उपस्थित होते. 
२०२०-२१ या वर्षात नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयासाठी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमता असल्याने राज्य कोट्यातून ८५ जागा व ऑल इंडिया कोट्यातून १५ जागा भरल्या जाणार आहेत. ऑल इंडिया कोट्यातील जागा भरण्यास विलंब असल्याने या जागा महाराष्ट्र कोट्यातून भरल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही प्रवेश प्रक्रिया तीन फेरीत पूर्ण होणार असल्याने संस्थेमध्ये १०० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असल्याने शैक्षणिक प्रयोजनासाठी अत्यावश्यक असलेल्या तीन लाख रूपयावरील यंत्रसामुग्री खरेदी प्रक्रिया सुरू आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासकीय व शैक्षणिक कामे व प्रयोगशाळेसाठी अत्यावश्यक वर्ग १ ते वर्ग चारचे कर्मचारी लवकरच पुरवण्यात येतील असे संचालक डाॅ. तात्याराव लहाने यांनी कळवले आहे. 

Web Title: Renuka Gavit, a daughter of Nandurbar, became the first student of a medical college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.