१०८ रुग्णवाहिकांऐवजी पर्यायी व्यवस्थेसाठी प्रस्ताव तयार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 12:36 PM2020-10-30T12:36:52+5:302020-10-30T12:36:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : १०८ रुग्णवाहिकेबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेता सीएसआर अंतर्गत पर्यायी रुग्णवाहिका व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रस्ताव ...

Proposal will be prepared for alternative arrangement instead of 108 ambulances | १०८ रुग्णवाहिकांऐवजी पर्यायी व्यवस्थेसाठी प्रस्ताव तयार करणार

१०८ रुग्णवाहिकांऐवजी पर्यायी व्यवस्थेसाठी प्रस्ताव तयार करणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : १०८ रुग्णवाहिकेबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेता सीएसआर अंतर्गत पर्यायी रुग्णवाहिका व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा अशा सुचना खासदार डॅा.हिना गावीत यांनी दिशा समितीच्या बैठकीत दिल्या. 
जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीची बैठक खासदार डॉ.हिना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस आमदार डॉ.विजयकुमार गावीत,आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अशासकीय सदस्य कांतीलाल टाटीया, बबीताताई नाईक, डॉ.स्वप्नील बैसाणे, प्रदीप वळवी आदी उपस्थित होते.
यावेळी बीएसएनएल, कृषी, सिंचन, सार्वजनिक वितरण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, आरोग्य आदी विविध विभागांशी संबंधित केंद्रीय योजनांचा आढावा घेण्यात आला. दुर्गम भागातील नागरिकांना योजनांचा प्राधान्याने लाभ देण्याचे निर्देश देताना डॉ.गावीत म्हणाल्या, जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत माहिती संकलीत करून सादर करावी. प्रकल्पाचा उपयोग सिंचनासाठी होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. १०८रुग्णवाहिकेबाबत तक्रारी येत असल्याने सीएसआर अंतर्गत पर्यायी रुग्णवाहिका व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा. ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणीदेण्याचे उर्वरीत काम त्वरीत पूर्ण करण्यात यावे. मुद्रा योजनांचा लाभ गरजू लहान व्यावसायिकांना देण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे. वनबंधू कल्याण योजनेअंतर्गत नागरिकांचा विमा काढण्यासाठी बँक, गटविकास अधिकारी आणि आदिवासी विभागाने एकत्रितपणे नियोजन करावे. ग्रामीण भागात मनरेगा अंतर्गम कामांची मागणी आल्यास त्वरीत उपलब्ध करून द्यावे व तळोदा आणि धडगाव तालुक्यातील तक्रार असलेल्या कामांची माहिती घ्यावी. ऑनलाईन शिधापत्रिका देण्याचे काम लवकर पूर्ण करावे. कमी धान्य देणाऱ्या रेशन दुकानदारांवर कारवाई करावी. अंगणवाडी बांधकाम व दुरुस्तीची कामे लवकर पूर्ण करावी. बीएसएलने सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना करावी, असे त्यांनी सांगितले. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Proposal will be prepared for alternative arrangement instead of 108 ambulances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.