The path to the field held by the Corona dread | कोरोनाच्या भितीने धरली शेताची वाट

कोरोनाच्या भितीने धरली शेताची वाट

लोकमत न्यूज नेटवर्क
बलवंड : कोरोनाचा संसर्ग होवून अपाय होवून नये यासाठी दक्षता म्हणून प्रशासन उपाययोजनांना वेग देत आहे़ यात ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने वेगळे मार्ग धरले असून यात गावापेक्षा शेतात राहण्यास पसंती दिली जात आहे़ शतकापूर्वी आलेल्या रोगाच्या साथीला लांब ठेवण्यासाठी हीच पद्धत अवलंबल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून पूर्व भागातील १० गावांमधील ७५ टक्के नागरिक शेताकडे निघून गेले आहेत़
नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील बलवंड, रजाळे, सैताणे, खर्दे खुर्द आणि वैंदाणे या गावांमधील ग्रामस्थ गेल्या आठ दिवसांपासून शेतशिवारातील झोपड्या करुन मुक्काम करत आहेत़ ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती दिवसेंदिवस वाढत असल्याने यावर उपाययोजना म्हणून ग्रामस्थ शेतशिवारात राहणे पसंत करत आहेत़ या भागातील बहुतांश शेतकऱ्यांच्या मुक्काम करण्यालायक झोपड्या किंवा छोट्या आकाराची घरे शेतात आहेत़ याठिकाणी पाण्याची सोय असल्याने ग्रामस्थ निवासासाठी निघून गेले आहेत़ याठिकाणी कोणीही येणे शक्य नसल्याने सुरक्षित अशीच स्थिती राहणार असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे़ दिवसेंदिवस हा प्रकार वाढत असून पूर्व भागातील इतर गावांमधील ग्रामस्थ घरातील शिधा घेऊन शेतात जात आहेत़ काहींकडून तात्पुरत्या झोपड्यांची निर्मिती करण्यात आली आहे़ तर काहींनी बैलगाडी आणि चारचाकी इतर वाहनांमधून गरजेचे संसारोपयोगी साहित्य शेतातील घरांमध्ये नेत आहेत़ ग्रामीण भागात यापूर्वीही १८ व्यात शतकात आलेल्या रोगराईची साथ आणि दुष्काळावेळी पाण्याची गरज म्हणून ग्रामस्थांनी शेतशिवारात स्थलांतर केल्याचे दाखले ज्येष्ठ ग्रामस्थ देत आहेत़
शेतशिवारात रात्री अपरात्री मुक्काम करणे धोक्याचे असल्याची माहिती असल्याने रात्रीच्यावेळी घरातील युवक आणि कर्ते पुरुष आळीपाळीने राखणदारी करुन कुटूंबांचे रक्षण करत आहेत़ अद्यापही पूर्व भागातील गावांमधील शेतकरी शेतशिवारात निवासासाठी जाण्याच्या तयारीत असून त्यांच्याकडून तशी सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे़ दरम्यान शेतशिवारात राहणाºया या शेतकºयांच्या सुरक्षेसाठी आरोग्य विभागाचे पथकही त्यांना भेटी देऊन वेळोवेळी त्यांची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कार्यवाही सुरु आहे़

पूर्व भागातील गावांमध्ये गेल्या हंगामात पावसाने चांगली साथ दिल्याने शेतशिवारात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात शेतात भरपूर कामे होती़ रब्बी हंगाम संपला असला तरी बºयाच ठिकाणी शेतीकामे बाकी आहेत़ या कामांसाठी मजूर येत नसल्यानेही अडचणी येत होत्या़ यावर मात करत शेतकºयांनी कोरोनातूनही मार्ग काढत कुटूंबासह शेताची वाट धरली आहे़ रजाळे ते सैताणे आणि खर्दे खुर्द परिसरातील १५० च्या जवळपास शेतकरी कुटूंबांसह शेतांमध्ये मुक्कामी आहेत़ याठिकाणी संपूर्ण कुटूंब शेतशिवारातील कामांसह इतर अनेक बाबींकडे लक्ष देत आहेत़ बºयाच घरांमध्ये लहान मुले असल्याने त्यांना संसर्ग होवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कुटूंबातील महिलांकडून देण्यात येत आहे़

Web Title: The path to the field held by the Corona dread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.