बसची दुचाकींना धडक, एक ठार, दोनजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:26 PM2020-02-23T12:26:14+5:302020-02-23T12:26:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव एस.टी.बसने पुढे उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिल्याने एकजण ठार तर दोनजण जखमी ...

One killed, two injured in bus mishap | बसची दुचाकींना धडक, एक ठार, दोनजण जखमी

बसची दुचाकींना धडक, एक ठार, दोनजण जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरधाव एस.टी.बसने पुढे उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिल्याने एकजण ठार तर दोनजण जखमी झाल्याची घटना वाकीपाडा, ता.नवापूर नजीक घडली. बस चालकाविरुद्ध नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष बाबू मावची (३५) रा.बारी, ता.नवापूर असे मयताचे नाव असून वरीष बारक्या नाईक व जगन मिऱ्या गामीत, रा.कटासवान, ता.उच्छल यांच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, धुळे-सुरत महामार्गावर वाकीपाडा गावाजवळील नवीफळीजवळ दोन दुचाकीस्वार उभे होते. त्यावेळी मागून आलेल्या भरधाव एस.टी.बसने (क्रमांक एमपी १० पी ०९९०) धडक दिली. त्यात सुभाष मावची यांचा जागीचच मृत्यू झाला तर वरीष नाईक व जगन गामीत हे जबर जखमी झाले.
अपघातानंतर मध्यप्रदेश परिवहन विभागाचा बस चालक तेथून पसार झाला. रस्त्यावरून जाणाºया वाहनचालकांनी जखमींना मदत केली. याबाबत वरीष नाईक यांनी फिर्याद दिल्याने मध्यप्रदेश परिवहन विभागाच्या बस चालकाविरुद्ध नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास जमादार कृष्णा पवार करीत आहे.

Web Title: One killed, two injured in bus mishap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.