धक्काबुक्कीत खाली पडल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:33 PM2020-05-29T12:33:31+5:302020-05-29T12:36:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : धक्काबुक्कीत खाली पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना म्हसावद येथे घडली. दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

One died after falling in a pushback | धक्काबुक्कीत खाली पडल्याने एकाचा मृत्यू

धक्काबुक्कीत खाली पडल्याने एकाचा मृत्यू

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : धक्काबुक्कीत खाली पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना म्हसावद येथे घडली. दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी तीन संशयीतांना अटक करण्यात आली असून सात संशयीत आरोपी फरार झाले आहेत.
युवराज रोहिदास अहिरे (५४) रा.म्हसावद असे मयताचे नाव आहे. पोलीस ूसुत्रांनुसार, बुधवारी रात्री नऊ वाजता भरत दशरथ जगदेव हा शिविगाळ करत होता. युवराज यांनी तु कोणास शिवीगाळ करत आहे असा जाब विचारल्याचा राग येवून धक्काबुकी केली. याचवेळी इतर नऊ जणांनीही गर्दी करून शिवीगाळ केली. धक्काबुक्कीत युवराज अहिरे धक्का लागुन पडले. दगडावर डोके आपटल्याने बेशुध्द पडले. त्यांना तातडीने म्हसावद ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले. तेथेच उपचार सुरू असतांना मृत्यू झाला.
अंबालाल देविदास अहिरे यांनी फिर्याद दिल्याने संशयीत चेतन सुरेश शिरसाठ, भरत दशरथ जगदेव, हरीश मधुकर अहिरे, मधुकर विठ्ठल अहिरे, सुरेश बाबुराव शिरसाठ, मनोज कचरू सामुद्रे, प्रशांत कचरू सामुद्रे, विनोद दौलत अहिरे, बेबीबाई दशरथ जगदेव, आरस्तोल विठ्ठल अहिरे याच्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी म्हसावद पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलीक सपकाळे यांनी भेट दीली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पवार करीत आहे. चेतन शिरसाठ, हरीश अहिरे, सुरेश शिरसाठ यांना अटक करण्यात आली असून इतर सात संशयीत फरार झाले आहेत.

Web Title: One died after falling in a pushback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.