लहान बालकाला दुचाकीवर बसवून त्याचा मोबाईल घेत एकाने काढला पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 12:55 PM2020-10-20T12:55:42+5:302020-10-20T12:56:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा तालुक्यातील रोझवा पुर्नवसन येथे शेतातील घरात ऑनलाईन अभ्यास करणार्या बालक मोबाईल देत नसल्याने ...

One of the children was taken away on a bike and his mobile phone was taken away | लहान बालकाला दुचाकीवर बसवून त्याचा मोबाईल घेत एकाने काढला पळ

लहान बालकाला दुचाकीवर बसवून त्याचा मोबाईल घेत एकाने काढला पळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील रोझवा पुर्नवसन येथे शेतातील घरात ऑनलाईन अभ्यास करणार्या बालक मोबाईल देत नसल्याने त्याला दुचाकीवर बसवून नेत त्याचा मोबाईल हिसकावून चोरट्याने पळ काढल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजता घडली. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल आहे. 
रोझवा येथील संतानसिंग जहांगीर पावरा हे पत्नी सुनीता, तीन मुली व आठ वर्षीय मुलगा धीरज यांच्यासोबत शेतातीत मुक्कामी होते. सोमवारी पावरा दाम्पत्य शेतात तर मुले शेतातील घरात अभ्यास करत होती. मुलगा धीरज हा इंग्रजी माध्यम शाळेत शिकत असल्याने ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल घेतला आहे. दरम्यान अभ्यास सुरू असताना शेताजवळ दुचाकी लावत एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी येवून मुलाकडून मोबाईल मागू लागला. धीरज याने तो न दिल्याने संशयिताने शक्कल लढवून तळोद्याची सफर घडवून आणतो म्हणून दुचाकीवर बसवत घेऊन गेला. अर्ध्या रस्त्यात धीरज याला उतरवून देत त्याचा मोबाईल हिसकावून घेत पळ काढला. घटनेनंतर काही वेळात रडणार्या बालकास गावातीलच जितेंद्र पावरा याने पुन्हा घरी सोडल्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला. घटनेनंतर संतानसिंग पावरा यांनी तळोदा पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद देत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेमुळे परीसरातील नागरीकांनी या भागात संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. 

Web Title: One of the children was taken away on a bike and his mobile phone was taken away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.