तळोद्यात दीड क्विंटल प्लास्टीक पिशव्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 01:19 PM2020-02-26T13:19:29+5:302020-02-26T13:21:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : प्लास्टीक बंदीप्रकरणी तळोदा पालिकेने मंगळवारी शहरातील तीन दुकानांवर अचानक धाडी टाकून त्यांच्याकडून दीड क्विंटल ...

One and a half quintals of plastic bags seized in the floor | तळोद्यात दीड क्विंटल प्लास्टीक पिशव्या जप्त

तळोद्यात दीड क्विंटल प्लास्टीक पिशव्या जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : प्लास्टीक बंदीप्रकरणी तळोदा पालिकेने मंगळवारी शहरातील तीन दुकानांवर अचानक धाडी टाकून त्यांच्याकडून दीड क्विंटल वजनाच्या प्लास्टीक पिशव्या जप्त केल्याची कारवाई केली. प्रशासनाने पुन्हा अचानक धाड टाकल्यामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, पालिकेने यात सातत्य राखण्याची अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
तळोदा शहरात प्लास्टीक बंदीबाबत पालिका प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय स्वतंत्र पथकही स्थापन करून या पथकाच्या माध्यमातून किरकोळ विक्रेते व भाजीपाला व्यावसायिकांना कॅरीबॅगा न वापरण्याच्या सूचनेबरोबर कडक समज देण्यात येत आहे. असे असताना शहरात कॅरीबॅगचा सर्रास वापर केला जात आहे. साहजिकच मुळावर घाव घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या मुख्याधिकारी सपना वसावे यांनी प्रशासकीय अधिकारी विजय सोनवणे, सचिन पाटील, विशाल माळी, सनी सूर्यवंशी, डिगंबर माळी, अश्विन परदेशी, नारायण माळी, मोतीलाल गोजरे, सुरेंद्र वळवी, रघुनाथ अहिरे यांच्यासह शहरातील भन्साली प्लाझा येथील के.जी. प्रोव्हीजन, मयूर स्वीट व ओम गुरुदेव अशा तीन व्यापारी प्रतिष्ठानांवर मंगळवारी दुपारी अचानक धाडी टाकल्या. या धाडीत संबंधित दुकानदारांकडून साधारण दीड क्विंटल वजनाच्या प्लॉस्टीक कॅरीबॅग आढळून आल्या. हा सर्व मुद्देमाल पथकाने जप्त केला असून संबंधित दुकानदारांवर प्रत्येकी पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातील दोन व्यावसायिकांवर यापूर्वीही दंडात्मक कारवाई केली होती. वास्तविक प्लास्टीकच्या कॅरीबॅगा न ठेवण्याबाबत पालिकेकडून कडक तंबी देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर तशा आशयाची लेखीही देण्यात आली असताना मुजोर व्यावसायिक सर्रास बेकायदेशीर बंदी असलेल्या प्लास्टीकच्या वस्तू विक्री करतात. त्यामुळे अशी कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि, कारवाईबाबत पालिका प्रशासनाने सातत्य राखणे आवश्यक आहे. तशी मागणीही पर्यावरणप्रेमींनी केली आहे. यासाठी पुरवठादारांनाच लक्ष्य करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: One and a half quintals of plastic bags seized in the floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.