उपजिल्हा रुग्णालयातील तयारीचा आमदार पाडवींकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:19 IST2021-07-22T04:19:55+5:302021-07-22T04:19:55+5:30
जीवघेण्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविली आहे. या संभाव्य कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना ...

उपजिल्हा रुग्णालयातील तयारीचा आमदार पाडवींकडून आढावा
जीवघेण्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविली आहे. या संभाव्य कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना कराव्यात म्हणून आमदार राजेश पाडवी यांनी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन तेथील तयारीचा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. त्यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सिजन प्लांटसंदर्भात जागेची पाहणी करून जागा निश्चित केली. दहा लीटर कपॅसिटीचे ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व ऑक्सिजन सिलिंडर ४७ लीटर कपॅसिटीचे ३० सिलिंडर, ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, उपजिल्हा रुग्णालय प्रमुख डॉ. विजय पाटील, आदिवासी महासंघाचे कार्याध्यक्ष हिरामण पाडवी, आदिवासी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नारायण ठाकरे, आदिवासी मोर्चा तालुका अध्यक्ष दारासिंग वसावे, प्रवीण वळवी, विठ्ठल बागले, किरण सूर्यवंशी आदी उपस्थित होते.