तापमानाचा पारा ४३ अंशापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:26 PM2020-06-01T12:26:05+5:302020-06-01T12:28:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात वारंवार बदल होत आहेत. सकाळी काही काळ ढगाळ वातावरण राहते ...

Mercury temperature up to 43 degrees | तापमानाचा पारा ४३ अंशापर्यंत

तापमानाचा पारा ४३ अंशापर्यंत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात वारंवार बदल होत आहेत. सकाळी काही काळ ढगाळ वातावरण राहते तर दुपारून मात्र पारा थेट ४२ ते ४३ अंशापर्यंत जातो. रविवारी कमाल तापमान ४२.८ अंशापर्यंत गेले होते. आद्रतेचे प्रमाण देखील २५ टक्केपर्यंत होते.
मे च्या शेवटी तापमानाचा चांगलाच कहर झाला. महिनाभर तापमान ४० ते ४२ अंशापर्यंत कायम होते. गेल्या दोन दिवसांपासून तापमानातील चढउतार मात्र जीवघेणा ठरत आहे. सकाळी नऊ वाजेपासूनच चटका देणारे ऊन सायंकाळी पाच वाजेपर्यंत कायम राहत आहे.
रविवारी सकाळी काही काळ ऊन-सावलीचा खेळ राहिला. नंतर मात्र दुपारून कडक ऊन पडले. तापमान तब्बल ४२.८ पर्यंत पोहचले. रात्रीच्या वेळी किमान तापमान देखील २४ ते २८ अंशापर्यंत राहिले होते. दुपारी आद्रतेचे प्रमाण देखील २५ टक्केपर्यंत राहिले. त्यामुळे घामाच्या धारांनी देखील हैराण केले होते.
हवेचा वेग मंदावला
गेल्या आठ दिवसांपासून हवेचा वेग तासी ३५ ते ४० किलोमिटर पर्यंत होता. रविवारी मात्र हवेचा वेग देखील मंदावला होता. केवळ १३ ते १६ किलोमिटर प्रतीतास राहिला. यामुळे उकाड्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली होती.
हवेचा मंदावलेला वेग हा मान्सूनसाठी लाभदायक असल्याचे बोलले जात आहे. हवामान विभागाने येत्या आठवड्यात पावसाचा अंदाज आधीच वर्तविलेला आहे. त्यामुळे शेतकरी शेतीउपयोगी कामे करण्यात व्यस्त आहेत.

येत्या दोन दिवसात जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे त्याकडे आता लक्ष लागून आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार १ ते ३ जून दरम्यान जिल्ह्यात वादळवाºयासह पावसाला सुरुवात होणार आहे.
४वादळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी शेतातील कामे उरकवून घ्यावे. नागरिकांनीही सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Mercury temperature up to 43 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.