मेघनाने पटकावला मिस महाराष्ट्र किताब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:13 PM2019-11-21T12:13:09+5:302019-11-21T12:13:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : नाशिक येथे ‘जेम्स अॅण्ड क्रिव्ह एंटरटेन्मेट प्रेङोंट’तर्फे घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत शहरातील चावरा इंग्लिश ...

Meghan won the Miss Maharashtra book | मेघनाने पटकावला मिस महाराष्ट्र किताब

मेघनाने पटकावला मिस महाराष्ट्र किताब

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : नाशिक येथे ‘जेम्स अॅण्ड क्रिव्ह एंटरटेन्मेट प्रेङोंट’तर्फे घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत शहरातील चावरा इंग्लिश मीडियमची विद्यार्थिनी मेघना राजेंद्रसिंग पाडवी या आदिवासी मुलीने मिस महाराष्ट्र किताब पटकावला.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील सुमारे शंभरहुन अधिक मुलींनी सहभाग नोंदवला होता. या वेळी टिकटॉक स्टार तथा परीक्षक नीता शिमकर, अकिल शेख, जेम्स ईमॉवल, काशिम सैयद आदी उपस्थित होते. तीन फे:यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. तिन्ही फे:यांमध्ये मेघना राजेंद्रसिंग पाडवी या विद्यार्थिनीने यश मिळवले. याबद्दल नीता शिमकर, अकील शेख यांच्या हस्ते मेघना पाडवीचा सन्मान करण्यात आला. 
या स्पर्धेसाठी कोरिओओग्राफर सैयद शेख यांचे मेघना पाडवीला मार्गदर्शन लाभले. अशा स्पर्धामध्ये सहभागी होऊन यश पदरी पाडून घेणारी आदिवासी मुलगी म्हणून ही मेघना पाडवी हिने मान मिळवला आहे. तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून अन्य विद्यार्थिनींनीही असे प्रय} करण्याचे आवाहन केले जात आहे. ती सद्यस्थितीत नंदुरबार येथील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नववीत शिक्षण घेत असून ती अभिनव विद्यालयाचे माध्यमिक शिक्षक राजेंद्रसिंग पाडवी व मोरंबा ता.अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रिना पाडवी यांची कन्या आहे. तिला लवकरच चित्रपटासह अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळण्याचे संकेत दिले जात आहे.
 

Web Title: Meghan won the Miss Maharashtra book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.