ध्येय असलेला माणूस कधीच अपयशी होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:23 AM2019-11-20T11:23:18+5:302019-11-20T11:23:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : जिथे मानवता असते तेथे जात पात पाहिली जात नाही. शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून आपणास ...

A man with a goal never fails | ध्येय असलेला माणूस कधीच अपयशी होत नाही

ध्येय असलेला माणूस कधीच अपयशी होत नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : जिथे मानवता असते तेथे जात पात पाहिली जात नाही. शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून आपणास हेच पहावयास मिळते. म्हणूनच महाराजांच्या  प्रमुख सरदारांमध्ये 20 मुसलमान होते. ध्येय निश्चित असलेला माणूस कधीच अपयशी होत नाही हे महाराजांकडून शिकले पाहिजे. वयाच्या 15 व्या वर्षीच ध्येय निश्चित करुन स्वातंत्र्य उभे करणारे राजे हे सर्वाचे आदर्श आहेत असे प्रतिपादन शिवशाहीर डॉ.विजय तनपुरे यांनी केले.
येथील शेठ व्ही.के. शहा विद्या मंदिराच्या प्रांगणात शहादा तालुका एज्युकेशन संस्थेतर्फे संस्थेचे अध्यक्ष कै.डॉ.विश्रामकाका व्याख्यानमाला सुरू आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प  शिवशाहीर डॉ.विजय तनपुरे यांनी शिवचरित्रातून ‘आम्ही बी  घडलो तुम्ही बी घडा’ या विषयावर गुंफले. ते पुढे म्हणाले, जगावे कसे हे रामायणाने तर मरावे कसे हे  भागवताने शिकवले. राष्ट्रासाठी   कसे जगावे हे संभाजी राजांनी तर राज्य कसे करावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले. संपूर्ण जग चालविण्यासाठी हे चार जण कारणीभूत आहेत. डॉक्टर खोटे बोलला तर पेशंटचे नुकसान होते, शिक्षक खोटे बोलला तर विद्याथ्र्याचे, पुढारी खोटे बोलला तर जनतेचे व संत खोटे बोलले तर संस्कृतीचा नायनाट होतो. छत्रपतींनी सर्वाना अधिकार दिले होते म्हणून स्वातंत्र्य चिरकाल टिकले व तेच आजच्या राज्यकत्र्यानीही लक्षात ठेवावे, असे मत त्यांनी मांडले.
 

Web Title: A man with a goal never fails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.