साहित्य उपलब्ध करा, मग दवाखाने सुरू करतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:32 PM2020-03-29T12:32:29+5:302020-03-29T12:32:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खाजगी दवाखाने उघडे ठेवण्यासंदर्भात शासनाच्या आदेशाबाबत आयएमए संघटनेच्या नंदुरबार शाखेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून अडचणी ...

Make the material available, then the clinic opens | साहित्य उपलब्ध करा, मग दवाखाने सुरू करतो

साहित्य उपलब्ध करा, मग दवाखाने सुरू करतो

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खाजगी दवाखाने उघडे ठेवण्यासंदर्भात शासनाच्या आदेशाबाबत आयएमए संघटनेच्या नंदुरबार शाखेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून अडचणी मांडल्या आहेत. आवश्यक ते साहित्य उपलब्ध झाले तर दवाखान्यांचे ओपीडी सुरू करण्यास हरकत नाही असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या भितीमुळे जिल्ह्यातील ९० टक्के खाजगी दवाखाने व त्यांच्यामधील ओपीडी बंद आहे. यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेनवर मोठा ताण पडत आहे. ही बाब लक्षात घेता खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने योग्य ती काळजी घेवून सुरू ठेवावे असे आदेश वजा सुचना शासनाने दिल्या आहेत. याबाबत आयएमए संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, दवाखान्यांमध्ये ओपीडी सुरू ठेवण्यास हरकत नाही. परंतु आवश्यक ते साहित्य उपलब्ध नाही. दवाखान्यांची जागा मोठी नसल्यामुळे एक मिटर अंतरावर रुग्णांना बसविणे, वेळोवेळी रुग्णांनी वापरलेले साहित्य अर्थात बसण्यासाठीचे बाक, जिना व इतर वस्तू तसेच डॉक्टरांनी तपासणीसाठी वारपलेले साहित्य निर्जंतूकीकरण वेळोवेळी करणे शक्य नाही.
दवाखान्यात गर्दी झाल्यास त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे. आधीच मॅनपॉवर कमी झालेली आहे. याशिवाय डॉक्टरांसाठी लागणारे एन-९५ मास्क, पीपीई किट, हॅण्ड सॅनीटायझर अपेक्षीत प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यांच्या किंमती अव्वाच्या सव्वा झाल्या आहेत.
सर्वच रुग्णांची जवळून तपासणी करणे किंवा त्यांना स्पर्श केल्याशिवाय तपासणी होऊ शकत नाही अशावेळी हे साहित्य उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु त्याचाच तुटवडा असल्याचेही या निवेदनात आयएमए संघटनेने म्हटले आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ.राजेश वळवी, सचिव डॉ.जयकुमार देसाई, खजिनदार डॉ.अनिकेत नागोटे आदींच्या सह्या आहेत.
दरम्यान, दिल्ली, राजस्थानमधील भिलवाडा येथे खाजगी रुग्णालयातील डॉक्टर आणि त्यांच्या कर्मचाºयांना देखील कोरोना विषाणूची लागण झाल्याचे लक्षात घेता डॉक्टरांमध्ये पुन्हा धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या साहित्याची मागणी आणखी वाढली असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

सूट नसल्याने तळोद्यात डॉक्टरांनी घालावा लागला रेनकोट
तळोद्यात खाजगी डॉक्टरांनी दवाखाने सुरु केले. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत रुग्णांना तपासणीसाठी आवश्यक असणारा सुट उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी चक्क रेनकोट घालून रुग्णांना तपासले. प्रशासनाने शहरातील खाजगी दवाखाने चालवणाºया डॉक्टरांची बैठक घेऊन दवाखाने अत्यावश्यक सेवा असल्याने संचारबंदीत ते सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. जे डॉक्टर आपले दवाखाने बंद ठेवतील त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई केली जाईल असा इशारा दिल्यानंतर आजपासून तळोदा शहरातील सर्वच दवाखाने सुरू असलेले दिसून आले. कोरणा विषाणूचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांकडे रुग्णांना तपासण्यासाठी अत्यावश्यक कोट व अन्य साधनसामग्री नसल्याने डॉक्टरांनी चक्क पावसाळ्यात वापरायचा रेनकोट घालून रुग्णांची तपासणी केली. काही डॉक्टरांनी तर स्पेशल आॅर्डर देऊन रेनकोट खरेदी केले व दवाखान्यातील कर्मचाºयांना देखील उपलब्ध करून दिले असल्याचे सांगितले. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रेनकोट घालून रुग्ण तपासणी करताना अनेक डॉक्टर घामाघूम झालेले दिसून आले.

Web Title: Make the material available, then the clinic opens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.