अवकाळीमुळे केळी व पपईचे रोगराईमुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 01:03 PM2019-11-13T13:03:20+5:302019-11-13T13:03:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : अवकाळीने उघडीप दिल्यानंतर आता त्याचे परीणाम समोर येत असून केळी वर करपा तर पपईवर ...

Loss of banana and papaya disease due to premature ejaculation | अवकाळीमुळे केळी व पपईचे रोगराईमुळे नुकसान

अवकाळीमुळे केळी व पपईचे रोगराईमुळे नुकसान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : अवकाळीने उघडीप दिल्यानंतर आता त्याचे परीणाम समोर येत असून केळी वर करपा तर पपईवर डावणी, करपा आणि मोजखा या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत़ यातून रब्बीचीही कामे सुरु करण्यात आल्याने शेतशिवारात शेतकरी आणि मजूर यांची वर्दळ वाढली आह़े 
शहादा तालुक्यातील  ब्राrाणपुरी सह परिसरात पपई, केळीची वार्षिक नियोजनानुसार शेतक:यांनी लागवड केली होती़ खरीप पिकांसोबत केळी आणि पपईचे संगोपन करत शेतक:यांनी मोठा खर्च केला होता़  परंतू अवकाळी पाऊस आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे दोन्ही फळ पिकांना ऊन कमी मिळाल्याने परिणाम झाला आह़े यातून पपईच्या झाडांवर झालेली फळधारणा ही अपेक्षेपेक्षा कमी असल्याने शेतक:यांना फटका बसला आह़े दोन आठवडय़ात ब:याच ठिकाणी शेतात पाणी साचल्याने ब:याच झाडांवर मर येऊन झाडांचे नुकसान झाले होत़े त्यात पुन्हा फळधारणा कमी होण्याची शक्यता असल्याने फवारणीला सुरुवात करण्यात आली आह़े  ब्राrाणपुरी, गोदीपूर, म्हसावद, अंबापुर, गणोर यासह मध्यप्रदेश सिमेलगतच्या गावांमध्ये केळीवर फवारणी करण्यात येत असल्याने शेतकरी कामांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र आह़े 
अवकाळीमुळे मका ,सोयाबीन आणि ज्वारीचे नुकसान झाले आह़े हे नुकसान पचवून शेतकरी पुन्हा शेतशिवारात कामाला लागल्याचे चित्र या भागात आह़े गहू आणि हरभरा पिकांचे नियोजन करत शेतक:यांनी कामांना सुरुवात केल्याचे दृश्य ब्राrाणपुरी व परिसरातील गावांमध्ये दिसून येत आह़े येत्या काळात अवकाळीची शक्यता कमी असल्याने हरभरा पेरणीला सर्वाधिक वेग दिला जात आह़े शेतशिवारात ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करुन येत्या 15 दिवसात हरभरा आणि गहू पेरणी करणार असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आल़े आह़े  दरम्यान एकीकडे खरीप पिकांचे नुकसान झाले असताना अतीवृष्टीमुळे जमिनीत वाढलेला ओलावा हरभरा आणि गहू पिकांना तारक ठरणार असल्याचा अंदाज शेतक:यांचा आह़े या पाश्र्वभूमीवर शहादा तालुक्यात यंदा गहू आणि हरभरा पिकाचे क्षेत्र दुपटीने वाढणार असल्याचे सांगण्यात येत आह़े शेतकरी निर्धारित क्षेत्रापेक्षा हाती असलेल्या पडीक क्षेत्रातही पीकपेरा करण्याच्या पवित्र्यात असल्याने हा अंदाज दृढ होत आह़े 
ब्राrाणपुरी भागात प्रशासनाने नियुक्त केलेल्या पथकाकडून पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत़ परंतू या पंचनाम्यात फळबागांवरील कीड रोग आणि करपा याचा समावेश करण्यासाठी शेतकरी पथकांना माहिती देत आहेत़  
करपा रोगाचे निदान झाल्यानंतर शेतक:यांनी रासायनिक औषधींची फवारणी करण्यास सुरुवात केली आह़े काही ठिकाणी पपईवर चांगल्या दर्जाचे फळ आल्याने ते टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत़ 
ब्राrाणपुरी परिसरातील केळी उत्पादकांना अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला आह़े केळीची झाडे उन्मळून पडण्यासह अनेक ठिकाणी केळीचे घड तुटल्याने नुकसान झाले होत़े करपामुळे या नुकसानीत वाढ होत असल्याने शेतकरी उपाययोजना करण्यावर भर देत आहेत़ 

Web Title: Loss of banana and papaya disease due to premature ejaculation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.