मोबाईल चार्जिंगसाठी जीवघेणा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 01:16 PM2020-02-23T13:16:56+5:302020-02-23T13:17:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोद्यालगत गुजरातच्या हद्दीत खाजगी साखर उद्योगाजवळ मोबाईल चार्जिंगसाठी ऊसतोड मजुरांकडून जीवघेणा खेळ सुरू आहे. ...

Life-threatening game for mobile charging | मोबाईल चार्जिंगसाठी जीवघेणा खेळ

मोबाईल चार्जिंगसाठी जीवघेणा खेळ

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोद्यालगत गुजरातच्या हद्दीत खाजगी साखर उद्योगाजवळ मोबाईल चार्जिंगसाठी ऊसतोड मजुरांकडून जीवघेणा खेळ सुरू आहे. मोबाईल चार्जिंगचा हा प्रकार एखाद्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता असून या साखर उद्योग व्यवस्थापनाने मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे.
मोबाईल हे संपर्काचे महत्त्वाचे साधन बनले असून डिजीटल क्रांतीमुळे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. ऊसतोड मजूरही त्याला अपवाद राहिलेले नाहीत. तळोद्याला लागून असलेल्या अक्कलकुवा रस्त्यावर गुजरात हद्दीतील एका खाजगी साखर उद्योग परिसरात ऊसतोड करणारे शेकडो मजूर झोपड्या करून राहतात. याठिकाणी राहणाऱ्या जवळपास सर्वच ऊसतोड मजुरांकडे विशेषत: युवा वर्गातील प्रत्येकाकडे अँड्रॉईड मोबाईल आहे. मोबाईल असला तरी त्याठिकाणी राहणाºया ऊसतोड मजुरांना मोबाईलच्या चार्जिंगसाठी जीवघेणी कसरत करावी लागते.
याठिकाणी राहणाºया ऊसतोड मजुरांना मोबाईल व इतर बॅटरीवर चालणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण चार्जिंग करता यावे यासाठी खाजगी साखर उद्योग व्यवस्थापनाकडून संरक्षक भिंतींवर विजेचे दोन बोर्ड बसविण्यात आले आहेत. या विजेच्या बोर्डावर मोबाईल चार्जिंगसाठी वेगवेगळे सॉकेट देण्यात आले आहेत. ज्यांना आपला मोबाईल चार्जिंग करायचा असेल तो त्याठिकाणी आपले चार्जर घेऊन येतो व मोबाईल आणि इतर उपकरणे चार्जिंग करून घेतो. याठिकाणी सकाळी कामाला जाण्यापूर्वी व संध्याकाळी कामावरून परतल्यावर मोबाईलच्या चार्जिंगसाठी अक्षरश: नंबर लागतात. नंबर लावण्यावरून बºयाचवेळा युवकांमध्ये बाचाबाची होत असल्याचा अनुभवही आहे. मोबाईलचे चार्जर सॉकेटमध्ये लावल्यानंतर मोबाईल कुठेतरी संरक्षक भिंतीवर अडकविण्यात येतो तर काही जण चार्जिंग होईपर्यंत मोबाईल हातात धरून तास-दीड तासभर त्याठिकाणी उभे राहतात. दोन्ही विजेचे बोर्ड संरक्षक भिंतीवर खिळ्यांच्या सहाय्याने बसविण्यात आलेले असून पुन्हा पुन्हा चार्जर लावल्या व काढल्यामुळे हे खिळे सैल होतात व बोर्ड भिंतीवरून निखळतो. हे बोर्ड कमी उंचीवर असल्याने चार्जिंगसाठी लहान मुलेही जीवघेणी कसरत करताना दिसून येतात.

Web Title: Life-threatening game for mobile charging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.