तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 12:49 PM2020-10-20T12:49:49+5:302020-10-20T12:49:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : शेवाळी-नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावर तळोदा बायपास ते वाण्याविहीर, अक्लककुवा, डोडवा गुजरात हद्दी दरम्यानच्या रस्त्यावर ...

Kingdom of potholes on the road from Taloda to Gujarat border | तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : शेवाळी-नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावर तळोदा बायपास ते वाण्याविहीर, अक्लककुवा, डोडवा गुजरात हद्दी दरम्यानच्या रस्त्यावर जागोजागी असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच अपघातासह दुखापतीसही हा रस्ता कारणीभूत ठरू पहात असून, वाहनामुळे उडणाऱ्या मुरूमच्या धुळीचे कण डोळ्यात जात आहे.
या राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा बायपास ते सोमावल फाटा, नळगव्हाण फाटा, शिर्वे फाटा, मोदलपाडा फाटा, वाण्याविहीर फाटा, पिपरीपाडा फाटा, राजमोई फाटा, अक्कलकुवा, सोरापाडा, वरखेडी नदीवरील पुलावर, खापर ते डोडवा गुजरात हद्द दरम्यान पावसाळ्या पूर्वीपासूनच जागोजागी मोठ मोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना गैरसोयीचे व त्रासदायक झाले आहे. वेळोवेळी या रस्त्यावरील खड्ड्याची दुरूस्ती करण्याची मागणी असताना संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने या खड्ड्यात वाहने आदळून अपघात होवून जीवितहानीला ते कारणीभूत ठरत आहे. अखेर या रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरूस्तीसाठी रास्ता रोको आंदोलनाचे नियोजन भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केले असता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेमतेम खड्डे भरण्याचे काम सुरू करून संपूर्ण रस्ता दुरूस्ती करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रशासनास सहकार्य करण्याची भुमिका घेत रास्ता रोको आंदोलन स्थगित केल्याने संबंधित महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेत या रस्त्यावरील खड्डे दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुन्हा या तळोदा बायपासपासून  शिर्वे फाटा, मोदलपाडा फाटा, वाण्याविहीर फाटा, अक्कलकुवा या रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केल्याने या मार्गावरून वाहनधारकांना मार्गस्थ होताना   नाहक त्रास सहन करावा लागत        आहे. तसेच मार्गावरील धुलीकरणही उडून डोळ्यात जात असल्याने अपघाताच्या घटनांसारखे प्रसंग छोट्या वाहनधारकांवर ओढावून आल्याचेही बोलले जात आहे. 
दरम्यान खड्डे भरण्यासाठी टाकण्यात आलेली खडी व मुरूमदेखील रस्त्यावर अद्यापपर्यंत पडून असल्याने संबंधित महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन टाळण्यासाठी  तात्पुरता रस्ता दुरूस्तीचा देखावा सादर करता आंदोलन स्थगित केले. हे आंदोलन स्थगित होताच दुरूस्तीचे काम बंद करण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

Web Title: Kingdom of potholes on the road from Taloda to Gujarat border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.