मुलींच्या वसतीगृहाला संरक्षक भिंतीची प्रतिक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:38 PM2020-06-01T12:38:31+5:302020-06-01T12:38:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चिंचपाडा : नवापुर तालुक्यातील चिंचपाडा येथे आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने मंजूरी ...

Just waiting for the protective wall of the girls' hostel | मुलींच्या वसतीगृहाला संरक्षक भिंतीची प्रतिक्षाच

मुलींच्या वसतीगृहाला संरक्षक भिंतीची प्रतिक्षाच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिंचपाडा : नवापुर तालुक्यातील चिंचपाडा येथे आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने मंजूरी देत मुलींच्या वसतीगृहासाठी इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे़ हे बांधकाम पूर्ण होवून दोन वर्षाचा कालावधी लोटूनही संरक्षक भिंतर बांधण्याची मात्र प्रतिक्षा आहे़ यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे़
चिंचपाडा गावातील रेल्वेस्टेशन भागात प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रकल्प कार्यालयाने आदिवासी मुलींसाठी वसतीगृहाची निर्मिती केली होती़ २००७ पासून सुरु झालेले हे वसतीगृह भाडोत्री इमारतीत सुरु करण्यात आले होते़ याठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्याने मुलींच्या पालकांनी चिंता व्यक्त केली होती़ सुविधा नसल्याने मुलींचे शिक्षणही धोक्यात होते़ याठिकाणी चांगल्या दर्जाची इमारत बांधण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता़ ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर आदिवासी विकास विभागाने २०१६ मध्ये वसतीगृहासाठी ४ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करत बांधकाम सुरु केले होते़ चिंचपाडा गावात बांधकाम करण्यात आलेल्या या इमारतींचे बांधकाम २०१८ मध्ये पूर्ण झाले होते़ सुसज्ज अशी इमारत आकारास आल्यानंतर पालकांसह चिंचपाड्यातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले होते़ यानंतरही मात्र विद्यार्थिनींना प्रत्यक्ष अ‍ॅडमिशन देण्यास २०१९ हे वर्ष उजाडावे लागले होते़ सुरु झालेल्या या वसतीगृहात गेल्या वर्षी निवासी म्हणून आलेल्या विद्यार्थिनींना सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंत उभाण्याची मागणी करण्यात आली होती़ यावर प्रत्यक्षात भिंत न बांधकाम आदिवासी विकास विभागाने थेट पत्र्याचे कंपांऊंड तयार केले आहे़ यातून वर्षभरापासून मोकाट गुरे आणि सुटीच्या काळात मद्यपी इमारत आवारात शिरत आहेत़ मद्यपींच्या धिंगाण्यामुळे या आवाराचे पावित्र्य धोक्यात आले आहे़
कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास विलंब असला तरी कधीकाळी येथे विद्यार्थिनी येणारच आहेत़ यामुळे तातडीने संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरु करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे़

७५ मुलींची क्षमता असलेल्या या वसतीगृहाच्या निर्मितीसाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला असताना संरक्षक भिंतीचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून रखडल्याचे सांगण्यात येत आहे़ भिंतीअभावी विद्यार्थिनींनी अनेक अडचणी येत असल्याचे त्यांच्याकडून गेल्या वर्षात सांगण्यात आले होते़ यावर तत्कालीन प्रकल्पाधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतली होती़ त्यानंतरही मात्र संरक्षक भिंतीचे काम रखडले असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़

४गावापासून लांब अंतरावर असलेल्या या वसतीगृहात सुरक्षेचा प्रश्न असल्याने भिंत बांधण्याची मागणी आहे़
४शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वसतीगृहाकडे जाण्यासाठी रस्ता निर्मिती करण्याचे आदेश होते़ परंतू प्रत्यक्षात तसे कामच सुरु झालेले नाही़
४रखडलेल्या भिंतीबाबत आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला असता तो होवू शकलेला नाही़ याठिकाणी नियुक्तीस असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे़
४कोरोनाचा संसर्ग थांबल्यावर सुरु होणाºया शैक्षणिक वर्षात या वसतीगृहात मुलींच्या क्षमतेत वाढ करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ तत्पूर्वी वसतीगृहाच्या संरक्षक भिंतीचा प्रश्न निकाली काढण्याची गरज आहे़

Web Title: Just waiting for the protective wall of the girls' hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.