हॉटेल कामगारावर काचेच्या बाटलीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:14 PM2020-02-23T12:14:03+5:302020-02-23T12:14:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हॉटेलमध्ये मोबाईल चार्र्जींगला लावला नाही याचा राग येवून एकाने काचेची बाटली फोडून वार केल्याची ...

The hotel worker was hit by a glass bottle | हॉटेल कामगारावर काचेच्या बाटलीने वार

हॉटेल कामगारावर काचेच्या बाटलीने वार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : हॉटेलमध्ये मोबाईल चार्र्जींगला लावला नाही याचा राग येवून एकाने काचेची बाटली फोडून वार केल्याची घटना शहादा येथे २१ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी शहादा पोलिसात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे आणि अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत चंद्रसिंग गिरासे, रा.मलोणी, ता.शहादा असे संशयीताचे नाव आहे. घटनेत पवन अमरसिंग वसावे व गणेश पाटील हे जखमी झाले. पोलीस सूत्रांनुसार, हॉटेल नंदनवन येथे प्रशांत चंद्रसिंग गिरासे हे गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथे काम करणारे पवन वसावे यांना त्यांचा मोबाईल चार्र्जींगसाठी लावून देण्याचे सांगितले. परंतु वसावे यांनी ते ऐकले नाही. त्याचा राग येवून गिरासे यांनी वसावे यास जातीवाचक शिविगाळ करून मारहाण केली.
टेबलावरील काचेची बाटली फोडून वार केला. यावेळी गणेश पाटील हे मध्यस्थी करण्यास गेले असता त्यांच्यावरही काचेच्या बाटलीचा वार झाला. त्यामुळे दोघे जखमी झाले.
याबाबत पवन वसावे यांनी फिर्याद दिल्याने प्रशांत गिरासे यांच्याविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न करणे आणि जातीवाचक शिविगाळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपअधीक्षक पी.टी.सपकाळे करीत आहे.

Web Title: The hotel worker was hit by a glass bottle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.