कापसाच्या ‘12 टक्के’ ओलाव्यात अडले ‘घोडे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:19 PM2019-11-21T12:19:21+5:302019-11-21T12:19:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीच्या पळाशी येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात गुरुवारपासून प्रत्यक्ष कापूस खरेदीला प्रारंभ ...

'Horses' stuck in cotton '12 per cent' moisture | कापसाच्या ‘12 टक्के’ ओलाव्यात अडले ‘घोडे’

कापसाच्या ‘12 टक्के’ ओलाव्यात अडले ‘घोडे’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बाजार समितीच्या पळाशी येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात गुरुवारपासून प्रत्यक्ष कापूस खरेदीला प्रारंभ होणार आह़े बाजार समितीने नियुक्त केलेले परवानाधारक व्यापारी येथे कापूस खरेदी सुरु करणार असून सीसीआयने 12 टक्के ओलावा असलेला कापूस खरेदी करण्याचा नियम कायम ठेवला आह़े     
 नंदुरबार बाजार समिती गेल्या आठवडय़ात कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आल्यानंतर काही वेळातच खरेदी बंद पडली होती़ बाजारात खरेदीसाठी आलेल्या सीसीआयच्या प्रतिनिधींनी 8 ते 12 टक्के  ओलावा (मॉईश्चर) असलेल्या कापसाचीच खरेदी करण्यास प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले होत़े सीसीआयच्या या अटीनंतर शेतक:यांनी कापूस खरेदी बंद पाडली होती़ यावर तोडगा काढत बाजार समितीने बुधवारी व्यापारी, सीसीआयचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी यांची बैठक घेत चर्चा केली होती़ या चर्चेतून गुरुवारपासून खरेदी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येऊन सीसीआय अटीशर्तीवरच कापूस खरेदी करेल असे स्पष्ट करण्यात आले आह़े सीसीआयकडून नंदुरबार केंद्रात 5 हजार 450 रुपये प्रतिक्विंटल कापूस खरेदी करण्यात येणार आह़े सीसीआयला कापूस देणा:या शेतक:यांनी कापूस पूर्णपणे कोरडा करुन आणावा असे सीसीआयपे कळवले आह़े परंतू  ऑक्टोबरमधील अवकाळी पावसामुळे ओली जमिन आणि रात्री पडणारे दव यामुळे कापसातील ओलावा थेट 20 टक्क्यांच्यापुढे गेला आह़े यातून आधीच महिनाभर कापूस हंगाम लांबल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक:यांनी आहे त्याच ओलाव्यानुसार सीसीआयने कापूस खरेदी करावी अशी मागणी कायम ठेवली आह़े 
गुरुवारी सकाळी येथे होणा:या कापूस खरेदीकडे लक्ष लागून राहणार आह़े 

दरम्यान पळाशी येथील खरेदी केंद्रावर बुधवारी सकाळी 10 ते 15 वाहनांमधून कापूस विक्रीसाठी शेतक:यांनी आणला होता़ या कापसाची परवानाधारक व्यापा:यांकडून खरेदी करण्यात आल्याची माहिती आह़े गुरुवारी सकाळी मार्केट कमिटीच्या दरांनुसार कापूस खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े परवानाधारक जिनिंग मिल व्यापारी हा कापूस खरेदी करणार आहेत़ परंतू गेल्या आठवडय़ात खरेदी सुरु झाल्यानंतर शेतक:यांनी व्यापा:यांना नकार सीसीआयने कापूस घ्यावा अशी मागणी केली होती़ 

जिल्ह्यातील यंदा 1 लाख 21 हजार हेक्टर्पयत कापसाची लागवड करण्यात आली होती़ पावसाने उशिराने दिलेल्या हजेरीमुळे कापूस लागवडही उशिराने झाली होती़ यातून प्रारंभी झालेली अतीवृष्टी आणि ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी यामुळे पिकाचे नुकसान झाले आह़े यात आता कापूस विक्री करताना ओलाव्याचे कारण पुढे करण्यात आल्याने शेतक:यांनी नाराजी व्यक्त केली आह़े एकीकडे शेतीक्षेत्रात ही समस्या असताना दुसरीकडे राष्ट्रीय बाजारपेठेत सरकीच्या दरांबाबत अनियमितता असल्याने खरेदी करण्याबाबत व्यापा:यांमध्ये अद्यापही उदासिनता आह़े कापसाच्या गाठींची निर्मिती गेल्या काही वर्षात वाढल्याने कापसाचे दर हे सातत्याने कमी झाल्याचे दिसून आले आह़े यंदाही कापसाचा पुरवठा हा अधिक होण्याची शक्यता आह़े 
 

Web Title: 'Horses' stuck in cotton '12 per cent' moisture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.