लायन्सतर्फे माळीवाड्यात आरोग्य तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 02:07 PM2020-02-24T14:07:08+5:302020-02-24T14:07:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लायन्स क्लब नंदुरबार व सावता माळी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माळीवाड्यात मोफत आरोग्य शिबिराचे ...

Health check-up camp in Maliwada by Lions | लायन्सतर्फे माळीवाड्यात आरोग्य तपासणी शिबिर

लायन्सतर्फे माळीवाड्यात आरोग्य तपासणी शिबिर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लायन्स क्लब नंदुरबार व सावता माळी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माळीवाड्यात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ शिबिरात ११० रुग्णांची तपासणी करण्यात आली़
संत सावता महाराज मंदिरात झालेल्या या शिबिरात सर्वसाधारण आरोग्य, दंत व नेत्र तपासणी करण्यात आली़ तपासणी करण्यात आलेल्या ११० पैकी १९ जणांना मधुमेह असल्याचे तपासणीतून स्पष्ट करण्यात आले़ २० रुग्णांना मोतीबिंदू असल्याने त्यांच्यावर होळ तर्फे हवेली शिवारातील कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे़ शिबिरात डॉ़ शाम सूर्यवंशी यांनी नेत्र, डॉ़ आशिष भदाणे यांनी दंत, डॉ़ वसीम पठाण व डॉ़ प्रियंका महाजन सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करुन त्यांच्या औषधोपचार केले़ शिबिरात रुग्णांची मधुमेह तपासणी डॉ़ अर्जुन लालचंदाणी यांनी केली़ यावेळी डॉ़ मनोज तांबोळी, डॉ़ पंकज पटेल, डॉ़ चेतन बच्छाव, डॉ़ देवेंद्र लांबोळे, शंकर रंगलाणी, राजेंद्र माळी, अशोक राजपूत, विजय माळी, आप्पा माळी, जगन्नाथ माळी, देवाजी माळी, विजय बोढरे, कैलास माळी, धर्मेंद्र पाटील, रमेश महाजन, भिमराव देवरे, मिठाराम माळी, बापू माळी, अभिमन्यू माळी, झगा माळी, जी़बी़लोखंडे, कुणाल माळी आदी उपस्थित होते़

Web Title: Health check-up camp in Maliwada by Lions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.