शहाद्यातील बाजारपेठेत सोशलडिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 10:10 PM2020-11-19T22:10:24+5:302020-11-19T22:10:30+5:30

n  लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :   कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना शासनाकडून नियम शिथिल करत मिशन बिगिन अगेन ...

The fuss of socialdistancing in the martyrdom market | शहाद्यातील बाजारपेठेत सोशलडिस्टन्सिंगचा फज्जा

शहाद्यातील बाजारपेठेत सोशलडिस्टन्सिंगचा फज्जा

Next

n  लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा :   कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना शासनाकडून नियम शिथिल करत मिशन बिगिन अगेन अंतर्गत व्यवहार हळूहळू सुरू करण्यात येत आहेत. प्रशासनाकडून जनतेला या काळात गर्दी न करण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असून, याला विक्रेते व नागरिक गांभीर्याने न घेता खरेदीसाठी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत व मास्क न वापरून प्रशासनाचे नियम पायदळी तुडवत आहेत. दरम्यान जिल्ह्यात सध्या रोज चाचणीत पॉझीटिव्ह येणाऱ्या रूग्णांमध्ये शहादा तालुक्यातीलच रूग्णांची संख्या जास्त येत असल्याने तो चिंतेचा विषय ठरला आहे.
शहरातील बाजारपेठात नागरिकांनी दिवाळीत व नंतरदेखील खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी तो संपलेला नाही. हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे नागरिकांचे कर्तव्य आहे. मात्र अनेकजण तर विनामास्क बाजारपेठेत फिरतानाही दिसत आहेत. त्यामुळे विनामास्क फिरणे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोनाला नागरिक खुले आमंत्रण तर देत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांची ही बेफिकीरी पुन्हा कोरोनाला आमंत्रण देत आहे. जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते. आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल. पाश्चिमात्य देशांप्रमाणे आपल्या येथेही पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येऊ नये यासाठी नागरिकांनी स्वत: आपली जबाबदारी ओळखून काळजी घेणं आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
ऑक्टोंबर महिन्यात लुळा पडलेला कोरोना विषाणू पुन्हा डोकेवर काढत आहे का असे मागील चार दिवसात शहादा तालुक्यातील ७१ रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यावर वाटू लागले आहे. आजअखेर एकूण दोन हजार १९१ रूग्ण बाधीत झाले असून, त्यातील दोन हजार ५३ रूग्ण बरे झाले आहेत. ८६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ५२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसात रूग्णांची वाढलेली संख्या बघता शहादेकरांसाठी हा चिंतेच्या विषय ठरू शकतो. यासाठी प्रत्येकाने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
'जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही' असं वारंवार सांगूनदेखील नागरिकांमध्ये काहीच फरक दिसून येत नाही. जसं काय कोरोना हा गेलाच अशी परिस्थिती बाजारपेठत आता निर्माण झाली आहे. सध्यातरी कोरोनावर एकमेव औषध म्हणजे काळजी घेणे हेच आहे. तरीदेखील बाजारपेठेत फेरफटका मारताना दिसून येतो की अनेकजन कोरोनाबद्दल काळजी घेताना दिसून येत नाही. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नाही. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे. कोरोनाचा प्रभाव थोडा कमी झाला असला तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. हे नागरिक विसरले आहेत.
शहादा शहरात मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणी तालुक्यातील नागरिक खरेदीसाठी येत असतात. तसेच शहरातील विविध भागात ठेला गाडीवर मोठ्या प्रमाणावर विक्रेते फळ व भाजीपाला विकतात. मात्र हे विकताना त्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची अंबलबजावणी करणे आवश्यक असताना ते कोरोना संदर्भात असलेली कोणतीच काळजी घेताना दिसत नसून विक्री करताना तोंडाला मास्क देखील लावलेले नाही. याबाबत काही विक्रेत्यांना हटकले असता. त्यांनी आता कोरोना गेला, संपलेला आहे, आता काही होत नाही असा समज त्यांच्यात असून ते बिनधास्तपणे कोणालाही न जुमानता शासनाच्या नियमांची पायमल्ली करत फळे व भाजीपाल्याची विक्री करताना दिसून येत आहेत. फळे - भाजीपाला ही रोज आणि नियमित लागणारी गरज आहे त्यामुळे विक्रेत्याकडे लोकांचे येणे जाणे चालू असते. अश्यामुळे कोरोनाचे संक्रमांचे देवाण घेवाण चालू होऊ शकते व संसर्गाचा धोका वाढू शकतो. नियम न पाळत कोरोनाचा फैलाव करण्यासाठी पोषक वातावरण तयार करणाऱ्यां व्यावसायिकांच्या संबंधितांनी बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. नागरिकांनी ज्या विक्रेत्याने मास्क लावला नसेल त्यांच्याकडे वस्तू खरेदी न करण्याच्या निर्णय घेतल्यास फायद्याचे ठरू शकेल.

Web Title: The fuss of socialdistancing in the martyrdom market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.