Video : नवापूर शहरातील रंगावली नदीला पुन्हा मोठा पूर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 07:58 AM2019-08-09T07:58:05+5:302019-08-09T07:58:27+5:30

जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी नवापूर शहरात मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Floods again flood the Rangavali river in Navapur city of nandurbar | Video : नवापूर शहरातील रंगावली नदीला पुन्हा मोठा पूर

Video : नवापूर शहरातील रंगावली नदीला पुन्हा मोठा पूर

Next

नंदुरबार - जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील रात्री मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यात वरील भागातील डांग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. रंगावली नदी लगत असलेल्या बोकळझर, वासरवेल, चौकी, वडकळंबी, गावात पाणी शिरले आहे. आदिवासी दिनाचा दिवसी आदिवासी ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी नवापूर शहरात मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, नवापूर शहरात येण्यासाठी रस्त्यावर पाणी आल्याने ग्रामीण भागातील नागरिक शहरात येऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी ग्रामीण भागातील आदिवासी मोठ्या उत्साहात आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. 

 

Web Title: Floods again flood the Rangavali river in Navapur city of nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.