वीज दुरुस्ती कामांमुळे दोन तालुक्यातील शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 01:54 PM2020-02-24T13:54:45+5:302020-02-24T13:54:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यात वीज कंपनीकडून वेळोवेळी वीज दुरुस्तीची कामे सुरु करण्यात येत असल्याने ...

Farmers in two talukas were harassed due to power repairs | वीज दुरुस्ती कामांमुळे दोन तालुक्यातील शेतकरी हैराण

वीज दुरुस्ती कामांमुळे दोन तालुक्यातील शेतकरी हैराण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यात वीज कंपनीकडून वेळोवेळी वीज दुरुस्तीची कामे सुरु करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यास अडचणी येत आहेत़ शनिवारी रात्री वीज पुरवठाच न झाल्याने शेतकऱ्यांचे हाल झाल्याचे समोर आले आहे़ विशेष म्हणजे दुरुस्ती होणार असल्याचे कंपनीकडून शेतकºयांना न कळवताच २४ तास वीज पुरवठा खंडीत होता़
वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागांतर्गत शहादा, तळोदा, धडगाव आणि अक्कलकुवा या चार तालुक्यात १३२ किलो व्हॅट दर्जाच्या वीजवाहिनीतून वीज पुरवठा करण्यात येतो़ शेतशिवारात तब्बल २७ हजार ५०० ग्राहकांना ह्या विजेचा पुरवठा करण्यात येतो़ यात तळोदा आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यांची १३२ के़व्ही लाईन सातत्याने नादुरुस्त होत असल्याचे प्रकार सुरु असल्याने शेतकºयांना त्याचा भुर्दंड बसत असल्याचे समोर येत आहे़ वीजपुरवठा होत नसल्याने शेतकºयांना गहू आणि हरभरा या पिकांना पाणी देणे शक्यच होत नसल्याने पिके धोक्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़ बºयाचवेळा रात्री उशीरा होणारा विज पुरवठा निर्धारित वेळेपेक्षाही कमी वेळ सुरु राहत असल्याने पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़ तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील उपकेंंद्रांत योग्य त्या सुविधा नसल्याने ही स्थिती निर्माण झाली असल्याने कंपनीने शेतकºयांच्या हंगामापुरते तरी योग्य तेवढा वेळ सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे़
शनिवारी झालेल्या प्रकारानंतर दोन्ही तालुक्यातील शेतकरी रात्रभर विजेच्या प्रतिक्षेत बसून असल्याचे सांगण्यात येत आहे़ कंपनीने न सांगता वीज पुरवठा बंद केल्याने अनेकांनी संताप व्यक्त करत कंपनीच्या अधिकाºयांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता़ परंतू संपर्क होऊ शकला नसल्याची माहिती आहे़

तळोदा आणि अक्कलकुवा या दोन्ही तालुक्यात सातपुड्याचा समावेश आहे़ तळोदा तालुक्यात सातपुड्याचा पायथ्याशी असलेले शेतकरी तसेच दुर्गम भागातील शेतकरी रब्बी हंगामात वीजेच्या भरवशाने पाणी पुरवठा करतात़ परंतू कंपनीकडून मात्र वेळोवेळी वीज पुरवठा खंडीत होत आहे़ तळोदा तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोरवड येथे वीज उपकेंद्र मंजूर करण्यात आले होते़ परंतू हे उपकेंद्र अद्याप पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आलेले नाही़ परिणामी बोरद, प्रतापपूर आणि अक्कलकुवा येथील उपकेंद्रांमध्ये वीज पुरवठ्याबाबत अडचणी येत आहेत़ वेळोवेळी बंद पडणारे ट्रान्सफार्मर्स, तुटणाºया विज वाहिन्या यांची जोडणी करण्यासाठी वीज पुरवठा बंद करावा लागत असल्याने शेतपिकांना अडचणी येत आहेत़ हंगाम आटोपण्यावर आला असताना वीजेची निर्माण होणारी समस्या निकाली न निघाल्यास शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत़

Web Title: Farmers in two talukas were harassed due to power repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.