सुविधांसाठी विद्याथ्र्यानी ठोठावला जिल्हाधिका:यांचा दरवाजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:24 PM2019-11-15T12:24:33+5:302019-11-15T12:24:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नर्मदा नवनिर्माण अभियानाच्या जीवन शाळांमधील विद्याथ्र्यानी विविध मागण्यांसाठी गुरुवार, बालदिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ...

Facilitator knocked out for convenience: Collector's door | सुविधांसाठी विद्याथ्र्यानी ठोठावला जिल्हाधिका:यांचा दरवाजा

सुविधांसाठी विद्याथ्र्यानी ठोठावला जिल्हाधिका:यांचा दरवाजा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नर्मदा नवनिर्माण अभियानाच्या जीवन शाळांमधील विद्याथ्र्यानी विविध मागण्यांसाठी गुरुवार, बालदिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिका:यांना निवेदन दिले. इतर शाळांमधील मुलांप्रमाणे सुविधा मिळाव्या अशी मागणी या बालकांनी केली. 
कचेरी मैदानावरून या मोर्चाला सुरुवात झाली. सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. तेथे सायंकाळी चार वाजेर्पयत विद्यार्थी बसून होते. यावेळी जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. त्यात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. गावातच सर्व सोयींयुक्त शिक्षण मिळावे, सरकारी शाळांप्रमाणे जीवन शाळांना सर्व शिक्षा अभियान लागू करावे व मध्यान्ह भोजन, वह्या, पुस्तके मिळावी. जीवन शाळेकरीता सरकारी दरात धान्य मिळावे. जीवन शाळेच्या जागेचे सपाटीकरण करून शाळेर्पयत जायला रस्ता करून मिळावा. घाट बांधून मिळावे. जीवन शाळेकरीता पक्की इमारत बांधून मिळावी. आरोग्याच्या सुविधा मिळाव्या. मृत्यूमुखी पडलेल्या विद्याथ्र्याना नुकसान भरपाई मिळावी, आदिवासी विभागामार्फत सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळावा आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. 
यावेळी ओरसिंग पटले, सियाराम पाडवी, पंडित वसावे, दिनेश पाडवी, चेतन साळवे, लतिका राजपूत, पुण्या वसावे, मेरसिंग पावरा, राजेंद्र      पावरा, मांगू पावरा, राजेश वसावे, कांतिलाल पावरा, रुमालसिंग पावरा, गौतम वळवी, सत्तरसिंग पावरा, किरसिंग वसावे, कृष्णा पावरा, किर्ता पावरा, गणेश वसावे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Facilitator knocked out for convenience: Collector's door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.