विरोधकांच्या प्रभागातील कामांमध्ये दुजाभावचा पालिका सभेत आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:55 PM2019-08-17T12:55:37+5:302019-08-17T12:55:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विरोधकांच्या प्रभागात काम करण्यास सत्ताधारी  दुजाभाव करीत असल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला. या आरोपांचे ...

Dua Bhabha municipality accused of working in opposition division | विरोधकांच्या प्रभागातील कामांमध्ये दुजाभावचा पालिका सभेत आरोप

विरोधकांच्या प्रभागातील कामांमध्ये दुजाभावचा पालिका सभेत आरोप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विरोधकांच्या प्रभागात काम करण्यास सत्ताधारी  दुजाभाव करीत असल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला. या आरोपांचे नगराध्यक्षा र}ा रघुवंशी यांनी खंडन करीत सर्व भागात समान विकास करीत असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, नगरपालिका कर्मचा:यांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय आजच्या सभेत घेण्यात आला.  
नंदुरबार नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी नगराध्यक्षा र}ा रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या स्व. अटल बिहारी वाजपेयी सभागृहात घेण्यात आली. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून सभेला सुरुवात करण्यात आली. त्यापूर्वीही दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
व्यासपीठावर उपनगराध्यक्ष परवेज खान, मुख्याधिकारी बाबुराव बिक्कड, कार्यालयीन अधिक्षक  दिपक मुळे उपस्थित होते. शहरातील साक्री नाका ते तलावपाडा भिलाटी परिसरात रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण व गटारीचे बांधकाम निकृष्ट दजार्चे असून, सत्ताधारी नगरसेवक विरोधकांच्या प्रभागात विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करीत असल्याच्या आरोप भाजप नगरसेवकांनी केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून नगराध्यक्षा र}ा रघुवंशी यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले
सभेच्या अजेंडय़ावर 18 विषय होते. अनेक विषयांवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार चर्चा झाली. दोन विषयांवर भाजपचे नगरसेवक प्रशांत चौधरी यांनी आक्षेप घेतला. साक्रीनाका ते तलाव पाडा भिलाटी पावेतो रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, रस्ता दुभाजक व गटार बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून, कामाचे देयक पडताळणी विना अदा करण्यात आले आहे. कोणाच्या परवानगीने देयके अदा करण्यात आली असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सभेत झालेल्या आरोपांचे खंडन करताना नगराध्यक्षा र}ा रघुवंशी म्हणाल्या, विकास कामांमध्ये सत्ताधा:यांकडून कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण झालेला नाहीे. नंदनगरीतील जनतेने आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्यास आम्ही पात्र आहोत. विरोधकांनी बिनबुडाचे आरोप करू नये. तथ्यहीन आरोप सहन करून घेणार नाही   असेही नगराध्यक्षा रघुवंशी यांनी स्पष्ट केले.  
सभेत 18 विषय बहुमताने मंजूर करण्यात आले. त्यात पालिका क्षेत्रातील मतदारांच्या जनता अपघात विमा नूतनीकरण करणे. आर्थिक वर्षात जादा वसूल झालेल्या रकमांचे समायोजन करणे, अवधूत पार्क, मनुदेवी पार्कच्या मोकळ्या जागेत चेनलिंक फेसिंग ची कामे करणे, बेघर घटकासाठी देखभाल व व्यवस्थापन खर्च मंजूर करणे, साक्री नाका ते तलावपाडा भिलाटी पयर्ंतचे रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण, रस्ता दुभाजक व गटार बांधकाम कामास मुदतवाढ देणे, नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत शासनाकडे निधी मागणीसाठी विकास कामांचे प्रस्ताव सादर करणे, घनकचरा प्रकल्पस्थळी बायो मायनिंग या कामास मुदतवाढ मिळणे, स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव स्थळी नवीन रोहित्र बसविणे व अतिरिक्त कामे करणे, पालिका कर्मचा:यांसाठी ड्रेस कोड लागू करणे, स्वच्छतेच्या कामांसाठी नवीन मोजमाप नुसार सुधारित अंदाजपत्रक तयार करणे, पालिकेच्या विभागांसाठी कुशल,अकुशल, तांत्रिक, प्रशासकीय कर्मचारी बाह्य संस्थेमार्फत पुरवण्याच्या कामास मंजुरी मिळणे आदी विषयांचा त्यात समावेश आहे.

Web Title: Dua Bhabha municipality accused of working in opposition division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.