लोणखेडा येथील शिबिरात ४२ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 12:33 PM2020-04-02T12:33:34+5:302020-04-02T12:33:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणखेडा येथील किसान उद्योग समूह व योगेश्वर गणेश मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे ...

Donor blood donation at a camp in Lonakheda | लोणखेडा येथील शिबिरात ४२ दात्यांचे रक्तदान

लोणखेडा येथील शिबिरात ४२ दात्यांचे रक्तदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणखेडा येथील किसान उद्योग समूह व योगेश्वर गणेश मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४२ दात्यांनी रक्तदान केले.
कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन झाल्यामुळे रुग्णालयात रक्ताची कमतरता जाणवू लागली असून प्रशासनाने नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्याअनुषंगाने तालुक्यातील लोणखेडा येथील किसान उद्योग समूह व योगेश्वर गणेश मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या शिबिरात जमा होणाऱ्या रक्तसाठ्याचा काही भाग कोरोनाजन्य विषाणूबाधीत गरजूंना सुपूर्द करण्यात येणार आहे. शिबिरात ४२ दात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.रक्तदात्यांमध्ये तीन फुटाचे अंतर ठेवून रक्तदान करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिबिरासाठी किसान उद्योग समूहाचे किशोर पाटील, किरण पाटील, वासुदेव पाटील, सुनील साळुंखे, गिरधर पाटील, एकनाथ सुतार, गणेश पाटील, खुशाल पाटील, धिरज पाटील, रवीन पाटील, छोटू पाटील, कविता पाटील, मनिषा पाटील, निता पाटील, राहुल राजपूत, प्रशांत पटेल, अविनाश पाटील, सचिन पाटील, जयेश पाटील, कैलास पाटील, विलास पाटील, योगीराज पाटील, जगदीश पाटील आदींनी परिश्रम घेतले. रक्त संकलनासाठी शहादा ब्लॅड बँकेचे नाजीम तेली यांच्यासह त्यांच्या टीमने सहकार्य केले.
दरम्यान, शहादा शहरातील ज्या नागरिकांना रक्तदान करावयाचे असेल त्यांनी शहरातील रक्तपेढीत डॉ.नाजीम तेली यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाव नोंदणीनंतरच प्रत्येकाला वेळ दिल्यानुसार रक्तदान घेण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Donor blood donation at a camp in Lonakheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.