वडाळी येथे 60 टन चारा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:42 PM2019-08-19T12:42:37+5:302019-08-19T12:42:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : अतिवृष्टीमुळे वडाळी येथील रंगूमती नदीला आलेल्या महापुराने नदीकाठावरील भरवाड कुटुंबांचे सुमारे 10 ते 12 ...

Distribution of 60 tonnes of fodder at Wadali | वडाळी येथे 60 टन चारा वाटप

वडाळी येथे 60 टन चारा वाटप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : अतिवृष्टीमुळे वडाळी येथील रंगूमती नदीला आलेल्या महापुराने नदीकाठावरील भरवाड कुटुंबांचे सुमारे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या कुटुंबांच्या गुरांसाठी फेस, ता.शहादा येथील गणराज शेतीमाल उत्पादक गटाने 60 टन चारा उपलब्ध करून दिला.
वडाळी येथील रंगूमती नदीकाठावर सहा भरवाड कुटुंबांचे वास्तव्य आहे. अतिवृष्टीने नदीला आलेल्या महापुरात या कुटुंबांचे ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी, धान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य, गुरांसाठी साठवलेल्या चा:यासह 15 ते 20 गायीचे वासरु व म्हशीचे 20 पारडू वाहून गेले. या भरवाड कुटुंबाला मदतीचा हात द्यावा म्हणून फेस येथील गणराज शेतीमाल उत्पादक गटाने सुमारे 60 टन चारा उपलब्ध करून दिला. या वेळी जि.प. सदस्य जयपालसिंह रावल, सारंगखेडय़ाचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पं.स. सदस्य गिरीश जगताप, सरपंच रामू भिल, उपसरपंच हिंमत सोनवणे, गणराज शेतीमाल उत्पादक गटाचे अध्यक्ष सुरेश पाटील, संचालक रमेश पाटील, तलाठी महेश ठाकरे आदी उपस्थित होते.
या वेळी जयपाल रावल म्हणाले की, पूरग्रस्त भरवाड कुटुंबांना आवश्यक त्या मदतीसाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. या कुटुंबांना घरकूल योजनेचा लाभ व पुरात वाहून गेलेल्या गुरांच्या पंचनाम्याबाबतही जाचक अटी शिथील करण्यासाठी प्रय} करणार असल्याचे सांगून गणराज शेतीमाल उत्पादक गटाने केलेल्या मदतीचे कौतुक केले. सुरेश पाटील म्हणाले की, पूरग्रस्त कुटुंबांना मदत करण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडे असलेल्या गुरांसाठी 60 टन चारा उपलब्ध करून देण्याचा निर्णय गटातील पदाधिका:यांना एकमताने घेतला. गटातर्फे परिसरातील   पूरग्रस्त भागातही 50 ते 60 टन चारा उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. आभार रमेश पाटील यांनी मानले.
दरम्यान, गणराज शेतीमाल उत्पादक गटाने गुरांसाठी आवश्यक असलेला चारा उपलब्ध करून दिल्याने पूरग्रस्त भरवाड कुटुंबांनी गटाचे आभार मानून शासनाने आम्हाला तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
 

Web Title: Distribution of 60 tonnes of fodder at Wadali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.