नऊ जणांची कोरोनावर ‘मात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 01:43 PM2020-06-01T13:43:25+5:302020-06-02T11:51:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील रजाळे येथील सात, शिंदखेडा तालुक्यातील एक आणि जिल्हा रुग्णालयातील दोघे असे ९ जण ...

Discharge to two of the Razali and two of the Civil | नऊ जणांची कोरोनावर ‘मात’

नऊ जणांची कोरोनावर ‘मात’

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील रजाळे येथील सात, शिंदखेडा तालुक्यातील एक आणि जिल्हा रुग्णालयातील दोघे असे ९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ त्यांना सोमवारी दुपारी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येऊन घरी रवाना करण्यात आले़ दरम्यान रविवारी रात्री दोघा पॉझिटिव्ह पुरुषांच्या संपर्कातील सहा जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़
रविवारी रात्रीच्या अहवालात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ उडाली होती़ दोघांना रात्री उशिरा आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते़ हिंगणी येथील २९ वर्षीय युवक आणि नंदुरबार शहरातील ४१ वर्षीय पुरुष यांना एकीकडे जिल्हा रुग्णालयात आणत असताना दुसरीकडे तब्बल ९ जण कोरोनामुक्त झाल्याची सुखद माहितीही प्रशासनाला मिळाली होती़ यात रजाळे येथील ६६ वर्षीय पुरुष, ६ वर्षीय बालिका, ५५ आणि २८ वर्षीय महिला तसेच ३१ आणि ३५ वर्षीय युवकांचा समावेश होता़ दरम्यान जिल्हा रुग्णालयातील दोघे कर्मचारी व शिंदखेडा येथील ३५ वर्षीय पुरुष कोरोनामुक्त झाल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने त्यांना सोमवारी सोडून देण्याचा निर्णय घेतला होता़ यानुसार दुपारी १२ वाजता त्यांना रुग्णवाहिकेने घराकडे रवाना करण्यात आले़ यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी. भोये, डॉ. के.डी. सातपुते सह जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर संसर्गमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २८ असुन सध्या ४ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. अन्य ३ कोरोना बाधितांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.
कोरोना हा उपचाराअंती या रोग बरा होत असल्याने नागरिकांनी आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरीत जिल्हा रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे याप्रसंगी करण्यात आले़
रजाळे येथे गेलेल्या कुटूंबाचे ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून स्वागत केले होते़ ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते़
तळोदा तालुक्यातील सोमावल येथील मयत गर्भवती महिलेच्या संपर्कातील सात जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे़ महिलेचा २५ मे रोजी नाशिक जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता़ तिच्या संपर्कात आलेल्या सात जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते़ दरम्यान त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ या रिपोर्टमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे़


सहा वर्षीय बालिका कोरोनामुक्त


कोरोनामुक्त झालेल्या सहा वर्षीय बालिकेचाही समावेश आहे़ ही बालिका जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वाधिक कमी वयातील कोरोनामुक्त ठरली असून तिचे रुग्णालय प्रशासनाकडून कौतूक करण्यात आले़ तिचा जिल्हा रुग्णालयाच्या स्टाफकडून विशेष गौरव करुन तिला घरी पाठवण्यात आले़


नागाई नगरातील मुंबई रिटर्न कोरोनाबाधिताच्या संपर्कात सात जण आल्याची माहिती समोर आली आहे़ यात दोघे तळोदा येथील असल्याने त्यांना तेथेच क्वारंटाईन करण्यात आले़ तर घरातील आई-वडील, पत्नी अणि मुलगी यांना नंदुरबारात क्वारंटाईन करण्यात आले़ सोमवारी सकाळी नवापुर तालुक्यातील घोगळपाडा येथे राहणारा कोरोनाबाधिताचा भाऊही क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झाला आहे़
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात मुंबईवरुन आलेल्या संबधित रुग्णाने शहरातील चार दवाखान्यात हजेरी लावली होती़ या चारही दवाखान्यांना २४ तास सील करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे़ त्यांचे निर्जंतुकीकरण ते पुन्हा सुरु होणार आहेत़ सीबी पेट्रोपपंप परिसर, बायपास रोड येथील हे दवाखाने असल्याचे सांगण्यात आले आहे़
जिल्हा प्रशासनाकडून नागाई नगरात जागोजागी बॅरीकेटींग करण्यात आले असून आरोग्य पथकांकडून तपासणी करण्यात येत आहे़
हिंगणी येथील २९ वर्षीय युवक आधीपासूनच क्वारंटाईन होता़ त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर हिंगणी गावात पुन्हा फवारणी करुन चौकशी सुरु करण्यात आली आहे़

Web Title: Discharge to two of the Razali and two of the Civil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.