मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटकेचा ‘प्रहार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:20 AM2019-11-20T11:20:02+5:302019-11-20T11:20:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करणा:या प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े ...

Detention 'strike' for violation of prohibition order | मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटकेचा ‘प्रहार’

मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटकेचा ‘प्रहार’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करणा:या प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनादरम्यान मनाई आदेश लागू असताना आंदोलन केल्याने गुन्हा दाखल करुन 11 जणांना अटक करण्यात आली होती़ ताब्यातील सर्वाना रात्री उशिरा सोडून देण्यात आल़े 
सोमवारी दुपारी झालेल्या या प्रकारानंतर शहर पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र चंपालाल पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बिपीन चंद्रकांत पाटील, प्रमोद दगडू पाटील, सावळाराम शिवाजी करे, मोहित राजेंद्र देसले, गुलाब महारु मराठे, अविनाश ईश्वरदास पाटील, संजय हरी पाटील, मनोज सुकलाल कोळी, गोपाळ हिंमत पाटील, नानका गणा पुनेकर, पावबा भिक्कन आखाडे यांच्याविरोधात मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े आंदोलकांना पोलीसांनी दुपारी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात नेले होत़े त्याठिकाणी अटकेची कारवाई करुन जामिनावर सुटका करण्यात आली़ 
प्रहार संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतक:यांच्या प्रश्नांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले होत़े हे आंदोलन दुपारी चार्पयत सुरु ठेवण्याची मुभा प्रशासनाने प्रहारला दिली होती़ परंतू दरम्यानच्या काळात पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करुन घोषणाबाजी केल्याने जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन झाल्याने कारवाई करण्यात आली़ 
 

Web Title: Detention 'strike' for violation of prohibition order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.