मूर्तीची मागणी यंदा निम्म्याने घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 12:39 PM2020-08-07T12:39:01+5:302020-08-07T12:39:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे नंदुरबारातील गणेशमूर्ती तयार करण्याच्या कारखान्यांमध्ये काम थंडावले आहे. मोठ्या मूर्र्तींचे काम पुर्णपणे थांबविण्यात ...

Demand for this specialty has grown significantly as a result of recent corporate scandals | मूर्तीची मागणी यंदा निम्म्याने घटणार

मूर्तीची मागणी यंदा निम्म्याने घटणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनामुळे नंदुरबारातील गणेशमूर्ती तयार करण्याच्या कारखान्यांमध्ये काम थंडावले आहे. मोठ्या मूर्र्तींचे काम पुर्णपणे थांबविण्यात आले आहे. तर चार फुटापर्यंतच्या मूर्ती तयार करण्याला आता प्राधान्य दिले जात आहे. अशा मूर्र्तींची मागणी पुर्ण करण्यासाठी मात्र कसरत होणार आहे. दरम्यान, यंदा गणेशमूर्ती उद्योगाला मोठा फटका बसला आहे. लाखो रुपयांच्या मोठ्या मूर्ती यंदा कारखान्यात ठेवाव्या लागणार आहेत. त्या वर्षभर सांभाळण्याची कसरत वेगळी असेल.
गणेशमूर्ती कारखान्यांना यंदा कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. मूर्ती कारखान्यांमध्ये काम करणाऱ्यांची संख्या देखील निम्म्याने कमी झाली आहे. त्यामुळे बेरोजगार कारागिरांची संख्याही वाढली आहे. आता मोठ्या कारखान्यांमध्ये मोठ्या मूर्तीऐवजी तीन ते चार फूट उंचीच्या मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. अवघ्या १५ दिवसांवर आलेल्य गणेशोत्सवासाठी जास्तीत जास्त मूर्ती तयार करून त्या विक्रीसाठी आणण्याचा प्रयत्न कारागिरांचा आहे.
शोधावा लागला रोजगार
मोठ्या मूर्ती बनविण्याचे बंद झाल्याने अनेक कारखान्यांमध्ये कामाला असलेल्या निम्मेपेक्षा अनेक जणांना नाईलाजाने कमी करावे लागले. त्यामुळे अनेकांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दुसरा रोजगारही शोधता येत नाही. आर्थिक फटकाही बसलेला अशा द्विधा संकटात बेरोजगार झालेले सापडले आहेत.
नंदुरबारच्या इतिहासात गणेशोत्सवाच्या काळात अनेक संकटे आली परंतु त्या संकटांवर मात करीत येथील गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. मूर्ती व्यवसायही सर्व संकटांना सामोरे गेलेला आहे. यंदा मात्र कोरोनाच्या अनोख्या संकटामुळे गणेशोत्सव आणि मूर्ती उद्योगावरही संकट आले आहे. या संकटाला सामोरे जातांना मात्र सर्वांचीच दमछाक होत आहे. त्यातून कसे सावरावे याबाबत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे या उद्योगावरील संकट दूर करण्यासाठी आता शासनानेच मदतीचा हात पुढे करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जसे इतर लघु व मध्यम उद्योजकांना आर्थिक मदतीचा हात देण्यात आला तसा मदतीचा हात जर मूर्ती उद्योगाला देखील दिला गेला तर मोठा आधार मिळू शकणार आहे. त्यासाठी मात्र, शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

नंदुरबारच्या मूर्तीला राज्याप्रमाणे गुजरात व मध्यप्रदेशातून देखील मोठी मागणी असते. या दोन्ही राज्यातील मंडळे दोन ते तीन महिने आधीच मूर्ती बुकींग करतात. शिवाय त्यांना जशी मूर्ती लागेल तशी ते बनवून देखील घेतात. राज्यापेक्षा या गुजरात व मध्यप्रदेशात विक्री होणाºया मूर्र्तींचे प्रमाण अधीक आहे.
यदा देखील तशी मागणी नोंदणी केली गेली होती. परंतु मार्च महिन्यात सुरू झालेल्या कोरोनामुळे आणि दोन महिन्यांपूर्वी चार फूट उंच मूर्तीच्या निर्णयामुळे मोठ्या मूर्र्तींना यंदा मागणीच नाही आणि जी नोंदणी झाली होती ती देखील रद्द करण्यात आली आहे.

परप्रांतीय विक्रेते यंदा कमी दाखल होण्याची शक्यता...
यंदा कोरोनामुळे परप्रांतीय मूर्ती कारागिर कमी संख्येने नंदुरबारात दाखल होतील असा अंदाज आहे. त्यामुळे स्थानिक कारागिरांना घरगुती आणि सार्वजनिक मंडळांसाठी लागणाºया मूर्ती तयार करण्याकरीता कसरत करावी लागणार आहे.
त्यासाठी आतापासूनच काही विक्रेत्यांनी बाहेरगावाहून मूर्ती खरेदी केल्या आहेत. साधारणत: एक फुटापासून चार फुटापर्यंत उंचीच्या या मूर्ती आहेत.
लहान अर्थात चार फूट उंच मूर्ती तयार करण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून कसरत सुरू आहे. मागणीप्रमाणे मूर्ती उपलब्ध व्हाव्या यासाठी काही कारागिरांचे नियोजन आहे.

नंदुरबारात मूर्ती बनविणारे लहान मोठे ३० ते ३५ कारखाने आहेत. शिवाय काही घरगुती मूर्ती बनविणारे कारागिर देखील आहेत. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासून या कारखान्यांमध्ये कामाला सुरूवात होते. शेकडो हात पाच ते सहा महिने राबत असतात.
पूर्वी नंदुरबारात मोजकेच कारागिर होते. त्यांच्या हाताच्या कलेने येथील मूर्ती व्यवसाय नावारूपाला आला. हळूहळू अनेकजण त्यात उतरले. काहीजण मोठ्या मूर्तीकारागिराकडे शिकून स्वत:चा कारखाना सुरू केला तर काही व्यवसाय म्हणून यात उतरले आहेत.
शहरातील गल्लोगल्ली असलेले कारखाने आणि घरगुती उद्योगातून तयार होणाºया मूर्र्तींची संख्या २५ हजारांपेक्षा अधीक जाते. त्यातून तीन महिन्यात लाखोंची उलाढाल होत असते. यंदा मोठ्या मूर्ती विक्री होणार नसल्याने ही उलाढाल निम्म्यावर येणार आहे.
यंदा मंडळांची संख्या देखील कमी राहण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवावर आलेल्या मर्यादा, विविध कायदे व अटी आणि कोरोनाचा दिवसेंदिवस होणारा प्रादुर्भाव यामुळे यंदा मंडळांची संख्या देखील कमी होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडे मंडळ नोंदणीचे अद्याप अर्जच आलेले नसल्याचेही चित्र आहे.

ग्लोबल टच...
नंदुरबारचा मूर्ती उद्योग राज्यात प्रसिद्ध आहे. नंदुरबारच्या मूर्ती उद्योगाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. तब्बल ६५ ते ७० वर्षांची परंपरा लाभलेल्या येथील उद्योगाला आता ग्लोबल टच मिळू लागला आहे. दोन वर्षांपूर्वी जवळपास ४०० लहान मूर्ती थेट दक्षीण अफ्रिकेत पाठविण्यात आल्या होत्या. यंदा देशातील अनेक भागात मोठ्या मूर्र्तींना मागणी होण्याची शक्यता लक्षात घेता यंदा दिवाळीसूनच कामाला सुरुवात करण्यात आली होती. परंतु कोरोनामुळे सर्व नियोजनावर पाणी फेरले गेल्याचे चित्र आहे.


शाडू माती मूर्ती
यंदा घरगुती गणपतीसाठी शाडू मातीच्या मूर्तीला मोठी मागणी आहे. त्यामुळे अनेक कारागिरांनी शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली आहे. काहींच्या मूर्ती बनवून तयार आहेत. तर काहींनी शाडू मातीच्या मूर्ती बाहेरगावाहून मागविल्या आहेत. यंदा शाडू मातीच्या मूर्तीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उलाढाल होण्याची शक्यता आहे.

Web Title: Demand for this specialty has grown significantly as a result of recent corporate scandals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.