अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 11:55 AM2020-03-30T11:55:03+5:302020-03-30T11:55:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अज्ञात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नंदुरबार-प्रकाशा रस्त्यावर कोरीटनजीक २७ रोजी ...

The death of a stranger in the crash of an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अज्ञात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नंदुरबार-प्रकाशा रस्त्यावर कोरीटनजीक २७ रोजी घडली. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंदाजे ३२ वर्षीय युवक असून त्याची ओळख पटू शकली नाही. सर्वत्र संचारबंदी आणि वाहतूक बंद आणि रस्ते सामसूम असतांना भरधाव वाहनाने धडक देण्याचा प्रकार अजबच मानला जात आहे. पोलीस सूत्रांनुसार, संबधीत युवक पायी जात होता. नंदुरबार-प्रकाशा रस्त्यावरील कोरीट गावाच्या फाट्याजवळील वळणावर त्याला वाहनाची धडक बसली आहे. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याने अंगात निळा टी शर्ट घातला आहे.
याबाबत कोरीटचे पोलीस पाटील गणेश नरोत्तम पाटील यांनी फिर्याद दिल्याने नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार वसावे करीत आहे.

Web Title: The death of a stranger in the crash of an unknown vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.