भोई समाजातर्फे शहाद्यात सांस्कृतिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 02:10 PM2020-02-24T14:10:57+5:302020-02-24T14:11:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील भोईराज भवन येथे जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सरस्वती माता, ...

Cultural events martyred by Bhoi community | भोई समाजातर्फे शहाद्यात सांस्कृतिक कार्यक्रम

भोई समाजातर्फे शहाद्यात सांस्कृतिक कार्यक्रम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील भोईराज भवन येथे जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी सरस्वती माता, आई जिजाऊ, संत शिरोमणी भीमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जयवंत मोरे तर प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, जिल्हाध्यक्ष संतोष वानखेडे, प्रा.मोहन मोरे, नगरसेवक संजय साठे, जिल्हा युवाध्यक्ष महेंद्र बोरदे, अशोक शिवदे, सुपडू खेडकर, जयंतीलाल खेडकर, दादाजी जगदेव, तालुकाध्यक्ष नरेंद्र वाडीले, चुडामण सूर्यवंशी, छोटू वाडिले, राहुल शिवदे, गुलाबराव सोनवणे, महादू मोरे, दीपक साटोटे, पमू अग्रवाल, रूपेश जाधव, विजय चौधरी उपस्थित होते. मुलांच्या सुप्तगुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम घेतला जातो. यंदा हा कार्यक्रम जिल्हास्तरीय घेण्यात आला. त्यात नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. नृत्य व गीतगायन स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमातील उर्वरित देणगी अनाथाश्रमातील अंध, अपंगांना देण्यात येणार आहे. नवीन जन्मलेल्या तीन कन्यांचा सत्कार प्रत्येकी तीन हजार १०० रुपयांची फिक्स डिपॉझीट देऊन करण्यात आला. बेटी बचाओ-बेटी पढाओ हा कन्या जन्माचा सत्कार उपक्रमाचा उद्देश असून या उपक्रमाचे आयोजन ग्रुपचे अध्यक्ष मिलिंद वाडीले, राजा खेडकर, स्वप्निल मोरे, धनेश्वर तामसे, किशोर मोरे, दादू वाडिले, विलास मोरे, सुनील मोरे, अविनाश मोरे, बाळा साठे, सागर वाडीले, विपुल मोरे, कल्पेश वाडिले, अविनाश वाडिले यांनी केले. पिंगाणे येथील सुनील वाडिले, आकाश निकवाडे, नितीन शिवदे, दीपक वाडिले, जितेंद्र वाडिले, भूषण भोई, दिनेश नुक्ते आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Cultural events martyred by Bhoi community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.