मंत्रीपदामुळे अक्कलकुव्यात काँग्रेसचे पुनरागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:36 PM2020-01-09T12:36:47+5:302020-01-09T12:36:53+5:30

अनिल जावरे । लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांना नुकतेच राज्यमंत्रीमंडळात स्थान मिळाल्याने अक्कलकुवा तालुक्यातील ...

Congress returns to Akkalkuya due to cabinet | मंत्रीपदामुळे अक्कलकुव्यात काँग्रेसचे पुनरागमन

मंत्रीपदामुळे अक्कलकुव्यात काँग्रेसचे पुनरागमन

Next

अनिल जावरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांना नुकतेच राज्यमंत्रीमंडळात स्थान मिळाल्याने अक्कलकुवा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाढलेल्या उत्साहामुळे अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या निवडणूक निकालावर मोठा परिणाम झाला आहे़ काँग्रेसने ६ गट आणि १४ गणांमध्ये यश मिळवल्याने तालुका काँग्रेसमय झाल्याचे निकालातून दिसून येत आहे़
दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे व शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या तालुक्यात त्यांना केवळ प्रत्येकी दोनच गटांवर समाधान मानावे लागले असल्याचे दोन्ही पक्षांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे़ अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक तिरंगी लढत झाली असताना या तिरंगी लढतीत भांग्रापाणी गटात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातच खरी चुरस दिसून येत होती़ या गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे यांच्या पत्नी बाजूबाई किरसिंग वसावे यांनी या गटातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे़ प्रतिष्ठेच्या असलेल्या भगदरी गटात माजी जिल्हा परिषद सदस्य सीक़े़पाडवी यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून मोठ्या मताधिक्क्याने विजय प्राप्त केला आहे़ दुसऱ्या क्रमांकावर भारतीय जनता पक्ष तर तिसºया क्रमांकावर शिवसेनेच्या उमेदवार व माजी आमदार डॉ़ नरेंद्र पाडवी यांच्या पत्नी आशाबाई पाडवी या होत्या़ पिंपळखुटा गटात भाजप व काँग्रेस या दोघांमध्ये टक्कर होती़ माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांनी त्यांच्या पत्नी निर्मलाबाई यांना उमेदवारी मिळवून देत विजश्री खेचून आणत गड शाबूत ठेवला आहे़ वेली गटात काँग्रेस व भाजप अशी सरळ लढत होती़ त्यात हिराबाई रविंद्र पाडवी यांनी निसटता विजय मिळवला असून विद्यमान सदस्य नितेश वळवी यांच्या पत्नी अवघ्या ३१ मतांनी पराभूत झाल्या आहेत़ होराफळी गटात माजी सभापती नटवर पाडवी यांच्या पत्नी निलूबाई पाडवी यांनी सर्वाधिक ७ हजार ५०९ मते मिळवित माजी सदस्या सुमनबाई बंडू वळवी यांचा पराभव केला आहे़
मोरंबा गटातून काँग्रेसचे प्रताप आतºया वावे यांनी तर रायसिंगपूर गटात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आमशा पाडवी यांचे पुत्र शंकर पाडवी यांनी प्रथमच निवडणूक लढवून विजय प्राप्त केला़ खापर गटातून भाजपाचे भूषण कामे यांनी काँग्रेसचे सुनील पाटील यांचा पराभव केला़ अक्कलकुवा गटात भाजपाचे कपिलदेव भरत चौधरी यांनी विजय प्राप्त केला़

गंगापूर गटातून काँग्रेसचे जितेंद्र दौलतसिंग पाडवी यांनी विजय मिळवत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांचा पराभव केला़ या गटातील पराभव भाजपाला आत्मचिंतन करायला लावणारा आहे़ पंचायत समितीच्या २० गणांपैकी १४ ठिकाणी काँग्रेसने यश मिळवल्याने त्यांची सत्ता स्थापन होणार आहे़ पंचायत समितीत भाजपाचे चार तर शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी झाले आहे़

Web Title: Congress returns to Akkalkuya due to cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.