बीएसएनएलची सेवा 15 दिवसांपासून ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:34 PM2019-08-19T12:34:40+5:302019-08-19T12:34:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : अक्कलकुवा तालुक्यात बीएसएनएल सेवा गेल्या 15 दिवसांपासून बंद झाली असून त्यामुळे या सेवेवर अवलंबून ...

BSNL service has been jammed for 15 days | बीएसएनएलची सेवा 15 दिवसांपासून ठप्प

बीएसएनएलची सेवा 15 दिवसांपासून ठप्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खापर : अक्कलकुवा तालुक्यात बीएसएनएल सेवा गेल्या 15 दिवसांपासून बंद झाली असून त्यामुळे या सेवेवर अवलंबून असलेली ब्रॉडबँड सेवा बंद असल्याने बँकेच्या व्यवहारांवर परिणाम झाला आहे. मोबाईल सेवेसह दूरध्वनी सेवाही ठप्प झाल्याने तालुक्यातील जनतेचा जगाशी संपर्क तुटल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिका:यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
अक्कलकुवा तालुक्यात एक हजारावर बीएसएनएलचे दूरध्वनी ग्राहक आहेत त्यातील बहुसंख्य ग्राहकांनी ब्रॉडबँड सेवा घेतली आहे. गेल्या 15 दिवसांपासून ही सेवा पूर्णत: बंद असल्याने त्यांचे व्यवसाय पूर्णत: बंद पडले आहेत. त्यामुळे त्यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.  बीएसएनएलच्या कनेक्टीव्हीटीअभावी स्टेट बँक, सेंट्रल बैंक, जिल्हा मध्यवर्ती बँक, टपाल कार्यालय, सायबर सेवा आदींचे कामकाज ठप्प पडल्यामुळे जनतेच्या अत्यावश्यक गरजा प्रभावित झाल्या आहेत. तसेच विद्याथ्र्याचे दाखले, ऑनलाईन अर्ज, शासकीय योजनांची माहिती, विद्यार्थी पोर्टलवरील माहिती भरणे या सर्व गोष्टींवर परिणाम झाला असून याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही अधिकारी लक्ष देत नसल्याने जनतेत या विभागाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी व विविध शासकीय दाखले ऑनलाईन मिळत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक खापर किंवा अक्कलकुवा येथे येतात. मात्र कनेक्टीव्हीटीअभावी कामे होत नसल्याने त्यांना दररोज चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे त्यांना प्रवासाचा आर्थिक भारही सहन करावा लागत आहे.
अक्कलकुवा येथील कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी रहात नसल्याने तक्रार कोणाकडे करावी हा कायमचा प्रश्न आहे. ब:याचा           तळोदा कार्यालयात तक्रार करावी लागते. त्याचप्रमाणे अक्कलकुवा, खापर व मोलगी येथील ऑपरेटर नसल्याने तेथे तात्पुरते नेमण्यात आलेले अकुशल कामगारांना दूरध्वनीचा बिघाड दुरूस्त करणे जमत नाही. त्यामुळे ग्राहकांची परवड होत आहे. त्या ऑपरेटर्सना गेल्या आठ महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळेही सेवेत व्यतय येत असल्याची तक्रार आहे. त्याचप्रमाणे तालुक्यात विजेचा लपंडाव हा नेहमीचा असून तास दोन तास वीजपुरवठा बंद पडल्यास बीएसएनएलची सेवा बंद पडते. बॅटरी रिचार्ज करण्यासाठी असलेल्या जनरेटरचा वापर केला जात नसून जनरेटर केवळ ‘शो-पीस’ झालेले आहेत. त्यामुळे जनतेची मोठी गैरसोय होत असून 15 दिवसांपासून सेवा बंद असूनही वरिष्ठ लक्ष देत नसल्याने जनतेने तक्रार कुठे           करावी? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत असून वरिष्ठांनी लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
 

Web Title: BSNL service has been jammed for 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.