भाजप सदस्यांतर्गत धुसफूस सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 12:15 PM2020-05-31T12:15:17+5:302020-05-31T12:15:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तळोदा नगरपालिकेची निर्विवाद सत्ता भाजपाकडे असली तरी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांमध्ये गेल्या दीड वर्षापासून अंतर्गत धुसफूस ...

BJP members start squabbling | भाजप सदस्यांतर्गत धुसफूस सुरू

भाजप सदस्यांतर्गत धुसफूस सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तळोदा नगरपालिकेची निर्विवाद सत्ता भाजपाकडे असली तरी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांमध्ये गेल्या दीड वर्षापासून अंतर्गत धुसफूस सातत्याने दिसून आली आहे. शुक्रवारच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वीच चव्हाट्यावर आले आहे. त्यामुळेच सभा तहकूब करण्याची नामुष्की घ्यावी लागल्याचे म्हटले जाते.
काँग्रेसच्या कारभाराला कंटाळून सन २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत तळोदावासियांनी लोकनियुक्त नगराध्यक्षांसह भाजपाचे तब्बल ११ नगरसेवक निवडून देवून एकहाती सत्ता भाजपाच्या स्वाधीन केली. साहजिकच स्थिर शासनामुळे विकासाच्या बाबतीत शहरवासीयांच्या आशादेखील पल्लवीत झाल्या होत्या. तथापि एक-दीड वर्षानंतरच सत्ताधाऱ्यांमधील आपसातील धुसफूस सातत्याने पुढे आली आहे. कधी विकास कामांवरून तर कधी कामांच्या ठेक्यावरून मतभेद झाल्याचे बोलले जाते.
गेल्या १५ दिवसांपासून दोन्ही गटातील संबंधतर अधिकच ताणले गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकाºयांमधील सुदोपसुदी दिसून आली. भाजपाचा एकही नगसेवक सभास्थळी साधा फिरकलादेखील नाही. साहजिकच त्यांच्यातील कटूता किती विकोपाला गेल्याचे दिसून येते. वास्तविक सर्वसाधारण सभेतील विषय पत्रिकेवरील दोन-तीन विषय विरोधकांशी निगडीत होते. त्याबाबत आपसात बसून चर्चा होऊ शकली असती अथवा विरोध केला असता. मात्र यावरून सभाच तहकूब करणे हे निश्चितच योग्य नाही. शहराच्या विकासाला खीळ घालण्याचाच प्रकार आहे. वास्तविक कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमिवर आघाडी सरकार अनेक योजनांना कात्री लावत आहे. एवढेच नव्हे आर्थिक अडचणींमुळे सर्वच विभागांना दिलेला निधीदेखील परत मागविला जात आहे, अशी वस्तुस्थिती असतांना विकास कामांचे सुयोग्य नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. मात्र सत्ताधारी अंतर्गत गटबाजीत रंगल्याचे चित्र आहे.
गेल्या दीड-दोन वर्षाच्या कालावधीत शहरात विकासाची चांगली कामेदेखील झाली आहेत. यात विरोधी काँग्रेस नगरसेवकांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेत कधीच विरोधी भूमिका घेतली नाही, वास्तविक विरोधकांनी त्यांच्या कारभारावर अंकुश ठेवणे अपेक्षित असतांना सत्ताधारीच एकमेकांचे पाय ओढत असल्याचे शुक्रवारच्या प्रकारावरून दिसून येते.
गेल्या १० वर्षानंतर भाजपाला पूर्णबहुमत देत नागरिकांनी पालिकेच्या सत्तास्थानी बसविले आहे. त्याचा सदुपयोग पदाधिकाºयांनी विकास कामांमध्ये खर्च करण्याची अपेक्षा नागरिकांनाही लागून आहे. परंतु लहान सहान गोष्टी, मानपानावरून सुद्धा सत्ताधाºयांमध्ये रूसवे-फुगवे होत असल्याचे बोलले जाते. त्यांच्या आपसातील भांडणात नागरिकांमध्ये चुकीचा संदेश पोहोचत असून, निदान पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तरी सत्ताधाºयांमधील अंतर्गत लाथाळ्यांची दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: BJP members start squabbling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.