सातपुडय़ात ‘गंगम्मा’ परसबागा ठरणार आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 01:02 PM2019-08-17T13:02:01+5:302019-08-17T13:02:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडय़ातील दुर्गम भागात घरोघरी लहानथोरांच्या पोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘गंगम्मा’ परसबागा आधार ठरणार आहेत़ काकर्दा ...

The basis for being 'Gangamma' watermelon in Satpudyat | सातपुडय़ात ‘गंगम्मा’ परसबागा ठरणार आधार

सातपुडय़ात ‘गंगम्मा’ परसबागा ठरणार आधार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुडय़ातील दुर्गम भागात घरोघरी लहानथोरांच्या पोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘गंगम्मा’ परसबागा आधार ठरणार आहेत़ काकर्दा ता़ धडगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या सहाकार्याने 200 महिला ग्रामस्थांनी परसबागांची निर्मिती केली आह़े     
काकर्दा परिसरातील गावांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अंशत: वाढलेले असल्याने त्याठिकाणी ताजा भाजीपाला पोषणात मिळावा या उद्देशाने कमी जागेत अधिक भाजीपाला उत्पादन देणा:या गंगम्मा मॉडेल परसबागांची निर्मिती करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, कोळदा व उमेद या संस्थांनी पुढाकार घेतला होता़ यानुसार काकरदा परिसरात परस बागांची निर्मिती केली गेली आह़े या परसबागांची अधिक माहिती मिळावी यासाठी काकरदा येथे महिलांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण  शिबिर घेण्यात आल़े यावेळी  परसबागांची निगा कशी राखली जावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आल़े गंगम्मा भाजीपाला परसबागेत तब्बल 15 प्रकारचा भाजीपाला पिकवण्याचे तंत्र महिलांना यापूर्वी समजावण्यात आले होत़े काकरदा परिसरात गेल्या काही वर्षात फळ झाडांची लागवड करण्यात आल्याने युवकांना रोजगार मिळाला आह़े त्यातुलनेत आता महिलांनाही भाजीपाला उत्पादनाची संधी मिळून दुर्गम भागातील कुपोषण दूर करण्यासाठी सहाय्यकारी उपक्रम राबवण्याची संकल्पना परिसरातील ग्रामस्थांनी कृषी विज्ञान केंद्राकडे मांडली होती़ त्यानुसार परिसरातील शेतशिवार आणि घरांच्या मागील बाजूस गोलाकार परबागांचे कुंपण नरजेस पडत आह़े सप्टेंबरमध्ये त्यातून उत्पादन येणार आह़े काकरदा परिसरातील शेतक:यांनी काही महिन्यांपूर्वी प्रात्यक्षिक स्वरुपात परस बागेची उभारणी करुन उत्पादनाची चाचपणी करुन घेतली होती़ याठिकाणी परसबाग लागवड व्यवस्थापनाबाबत कृषी विज्ञान केंद्रांच्या तज्ञांनी मार्गदर्शन केले होत़े कीटकनाशक आणि रासायनिक खते यांचा कमीत कमी वापर करुन उत्पादन घेण्यावर महिलांनी भर दिला होता़ प्रात्यक्षिक प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली़ तूर्तास 200 महिला परसबागांमध्ये दिवसातून चार तासांपेक्षा अधिक काळ वेळ देत आहेत़ परसबागांची चळवळ वाढावी यासाठी  440 शेतकरी महिंलांनी परसबाग करण्याचे नियोजन केले आह़े यातील 200 परसबागा ह्या गगमा मॉडेलमध्ये उभारण्यात आले आह़े परसबागेत पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्यांची लागवड करण्यात आली आह़े यात प्रामुख्याने पालक, पोकळा, मेथी, कोथींबीर, वेलवर्गीय कारले, गिलके ,दोडके, दुधीभोपळा, काकडी तसेच गावर, चवळी, भेंडी, टमाटे, वांगे, मिरची या रोपांची लागवड करण्यात आली आह़े याठिकाणी शेवगा आणि कडीपत्ताच्या रोपांची लागवड करण्यात आली आह़े या उत्पादनांना आहारात कसे समाविष्ट करावे याचेही प्रशिक्षण दिले जात आह़े 

Web Title: The basis for being 'Gangamma' watermelon in Satpudyat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.