बलवंडला विद्याथ्र्यानी अडवली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:28 AM2019-11-20T11:28:01+5:302019-11-20T11:28:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बलवंड : दिवाळीनंतर एसटीच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला, तर काही बसफे:या बंदही करण्यात आले. त्यामुळे ...

Balwand was stopped by a student | बलवंडला विद्याथ्र्यानी अडवली बस

बलवंडला विद्याथ्र्यानी अडवली बस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बलवंड : दिवाळीनंतर एसटीच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला, तर काही बसफे:या बंदही करण्यात आले. त्यामुळे शाळा - महाविद्यालयीन विद्याथ्र्याचे नियोजन चुकत आहे. शिवाय यामुळे विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान देखील होत असल्याचे म्हणत बलवंड परिसरातील विद्याथ्र्यानी बस अडवत आंदोलन केले. 
बलवंड ता.नंदुरबार या भागातून बहुसंख्य शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी एसटी बसने ये-जा   करीत शिक्षण घेत आहे. एसटीतून प्रवासासाठी त्यांनी मासिकप्रवास पास देखील काढले आहेत. दिवाळीपूर्वी बलवंडसाठी नंदुरबार आगारामार्फत सकाळी 9.15, दुपारी 1.15 व सायंकाळी 5.30 (बलवंड मुक्कामी) अशा बस सोडण्यात येत होत्या. परंतु दिवाळीनंतर या बसेसच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला. या बदलानुसार सकाळी 9.15 ला सोडण्यात येणारी बस   बलवंड गावाच्या पुढील हट्टीर्पयत सोडण्यात येत आहे. त्यामुळे ही   बस तब्बल एक तास उशिरा परत  येत आहे.  
एसटीच्या या बदलामुळे विद्याथ्र्याना एक तास उशिरा शाळा - महाविद्यालयात पोहोचावे लागत आहे. त्यात त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर दुपारी 1.15 वाजता सुटणारी बस दिवाळीनंतर बंदच करण्यात आली आहे. त्यामुळे या बसने प्रवास करणा:या शनिमांडळ, रजाळे, बलवंड येथील 70 पेक्षा अधिक विद्याथ्र्याना त्रास सहन करावा लागत आहे. विद्याथ्र्याची होणारी गैरसोय नंदुरबार आगार व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली. परंतु आगाराने याकडे दुर्लक्ष केल्याचे म्हणत विद्याथ्र्यानी बलवंड येथे सायंकाळीची एसटी बस  रोखत आंदोलन केले. हा प्रकार बस वाहक युवराज भिल यांनी भ्रमणध्वनीद्वारे आगार व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिले.
 

Web Title: Balwand was stopped by a student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.