शहादा पालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 01:28 PM2020-02-27T13:28:08+5:302020-02-27T13:28:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा पालिकेत घेण्यात आली़ बुधवारी पार पडलेल्या सभेत २०२०-२१ या आर्थिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा पालिकेत घेण्यात आली़ बुधवारी पार पडलेल्या सभेत २०२०-२१ या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकावर चर्चा करुन विकास कामे आणि नागरिकांसाठी सोयी सुविधांवर भर देण्यात येऊन चर्चा करण्यात आली़
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील होते़ मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी महत्त्वांच्या तरतूदींची माहिती सभागृहात दिली़ यावेळी उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, गटनेते प्रा़मकरंद पाटील, नगरसेविका वर्षा जोहरी, नगरसेवक लक्ष्मण बढे, अखलाक अन्सारी, नगरसेविका रिमा पवार, वाहीद पिंजारी, जाहेदाबी पिंजारी, संगीता मंदील, संगिता चौधरी, शहरेनाज पठाण, ज्योती नाईक, अनिता पाटील, ईक्बाल शेख सलीम, रियाज कुरेशी, आनंदा पाटील यांच्यासह प्रशासन अधिकारी भाऊसाहेब देशमुख, सहायक लेखापाल रविंद्र माळोदे, अल्ताफ मन्सूरी उपस्थित होते़
सभेत दैनंदिन स्वच्छता, पथदिवे, नाट्यगृह, भुयारी गटार, रमाई घरकुल योजनेंतर्गत भागातील रस्ते, दलित वस्तीतील रस्ते, रमाई घरकुल योजनेंतर्गत रक्कम वाटप, कर्मचारी वेतन, सेवानिवृत्ती वेतन, वृक्षारोपण यासह प्रस्तावित विकास कामांना या अंदाजपत्रकात प्राधान्य देण्यात आले़ चर्चेअंती या अंदाजपत्रकाला मंजूरी देण्यात आली़ मंजूरीनंतर हे अंदाजपत्रक जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवले आहे़ अंदाजपत्रकात विकासकामांसोबतच जलनिस्सारण, अग्निशमन भोगवटा, १३ व्या वित्त आयोगात दलित वस्ती सुधार अनुदान, नगरोत्थान, वैशिष्ट्यपूर्ण नगररचना युडी-६, लहान व मध्यम शहर प्रकल्प, भुयारी गटार, नाट्यगृह यासाठी प्रस्तावित निधीचीही मागणी आहे़
सभेत नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी शहरातील अनेक भौतिक सुविधांचा अर्थसंकल्पात समावेश आहे़ अंदाज पत्रकातील तरतूदींमुळे येत्या वित्तीय वर्षात विकासावे नवे पर्व पहावयास मिळेल असे सांगितले़
गटनेते प्रा़ मकरंद पाटील यांनी अंदाजपत्रकातील तरतूदी विषयी उपयुक्त सूचना केल्या़